मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियाबाहेर असलेल्या हरभजन सिंग काल रात्री उशिरा बुकी विशाल करियाला भेटण्यास गेला होता. विशाल करियावर कमला मिल आग प्रकरणातील आरोपींना लपवण्याचे आरोप आहेत. विशालचे क्रिकेटर्स आणि बॉलीवूड कलाकरांसोबत चांगले संबंध असल्याचे बोलले जातेय.
करियाच्या जुहूस्थित रिव्हिएरिया अपार्टमेंटमध्ये हरभजन गेला असता मीडियाने ते पाहिले. यावेळी मीडियापासून स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न हरभजनने केला मात्र कॅमेऱ्यात तो कैद झालाच. दरम्यान, मीडिया आल्याने हरभजन विशालला न भेटताच परत गेला. मिळालेल्या वृत्तानुसार, विशाल करिया हा बुकी म्हणून काम करतो.
सूत्रांच्या माहितीनुसार, हरभजन आणि विशाल जवळचे मित्र आहेत. १० वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. असंही म्हटलं जात की हरभजन सिंग १० वर्षे विशाल करियाच्या घरीच राहत होता. २०१६मध्ये हरभजनने विशाल सोबतचा एक फोटोही शेअर केला होता. दरम्यान, क्रिकेटवरील सट्टयात सहभागी असल्याचा आरोपही विशालवर ठेवण्यात आला होता मात्र अद्याप याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाहीये.
All about B.. boys looking sharp @vishalk3175 @Karia1_karia pic.twitter.com/XpEN5sCJkj
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 26, 2016
कमला मिल कंपाऊडमधील आगीप्रकरणी आरोपींना लपण्यासाठी मदत करणे तसेच पळून जाण्यासाठी मदत करण्याच्या आरोपाखाली करियाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.