ICC Test Rankings: टीम इंडिया (Team India) मंगळवारी दुपारी दीड वाजता टेस्टची नंबर 1 टेस्ट टीम (Test Team) बनली होती. आयसीसी (ICC Ranking) च्या वेबसाईटवर टीम इंडियाला पहिल्या नंबरवर दाखवण्यात आलं होतं. भारताचे आता 115 पॉईंट्स आहे. मात्र मंगळवारी सकाळी ऑस्ट्रेलिया 126 रेटिंगसह टॉपवर होती मात्र, ज्यावेळी भारताला टॉपवर दाखवण्यात आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाचे (Australia Points) पॉईंट्स 111 दाखवले जात होते. यावेळी टीम इंडियाच्या चाहत्यांनी नंबर 1 आल्यावर सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. इतंकच नाही तर सोशल मीडियावर याची चर्चा देखील झाली.
तब्बल दीड तासानंतर जवळपास 4 वाजता आयसीसीला त्यांच्या चुकीची जाणीव झाली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने टेस्ट टीमची ही रँकींग अपडेट केली. ऑस्ट्रेलिया 126 रेंटींग पॉईंट्स सोबत पुन्हा एकदा टॉपवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे भारतीय टीम 115 पॉईंट्ससह दुसऱ्या नंबरवर होती. यावेळी टीम इंडियाचे फॅन्स नंबर-1 झाल्याचा आनंद व्यक्तच करत होते, त्याचवेळी टीम दुसऱ्या स्थानावर पोहोचली आणि चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलं.
India spot on the in #icc new Test Ranking 1. India
India now T20- no.1 , ODI no.4,Test no.1#bcci #TeamIndia #ranking #believeinblue pic.twitter.com/8XXLnvygqE— Sartaj (@i_amSartaj) January 17, 2023
पुढच्या महिन्यामध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. यामध्ये टीम इंडियाकडे टेस्टमध्ये नंबर 1 बनण्याची संधी आहे. जर टीम इंडिया ही सिरीज 2-0 ने जिंकेल तर ती टॉपवर पोहोचेल. जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूद्धचे चारही सामने जिंकले तर आपले 124 पॉईंट्स होतील आणि ऑस्ट्रेलिया 117 पॉईंट्सह दुसऱ्या स्थानावर जाईल. बॉर्डर-गावस्कर सिरीजचा पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
आयसीसीच्या रँकींगमध्ये एखाद्या सिरीज संपल्यानंतर अनेक बदल होतात. सध्याच्या घडीला कोणतीही टेस्ट सिरीज सुरु नाहीये. भारताने डिसेंबरमध्ये शेवटची टेस्ट खेळली होती. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेसोबत सामना खेळला होती. अशामध्ये टेस्ट रँकिंगमध्ये बदल होण्याचा शक्यता नाही.
दरम्यान, आताच्या ताज्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलिया 126 रेटिंगसह पहिल्या स्थानावर, भारत 115, इंग्लंड 107, दक्षिण आफ्रिका 102 आणि पाचव्या क्रमांकावर 99 रेटिंगसह न्यूझीलंडचा संघ आहे.
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (ICC World Test Championship) ऑस्ट्रेलियाने आपलं स्थान निश्चित केलं आहे. अद्याप भारताच्या स्थानाबाबत अनिश्चितता असून ऑस्ट्रेलियाविरूद्ध्या मालिकेनंतर हे चित्र स्पष्ट होईल.