KBC 16 : 'कौन बनेगा करोड़पति 16' हा शो सगळे त्यांच्या माहितीसाठी पाहतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये उत्तर प्रदेशमधील सुमित यादव हे हॉटसीटवर बसले होते. सुमित यांचं 14 वर्षांचं 'केबीसी' मध्ये येण्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचं हे स्वप्न जेव्हा पूर्ण झालं त्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. पण 12 लाख 50 हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. आता हा प्रश्न नेमका काय होता, त्याविषयी जाणून घेऊया.
सुमित यादवनं गेम खेळण्याआधी सुत्रसंचालक असलेल्या अमिताभ बच्चन यांना सांगितलं की शोमध्ये येण्याच्या उत्सुकतेमुळे ते रात्रभर झोपले नव्हते. त्यानंतर अमिताभ यांनी सुमितसोबत खेळ सुरु केला. सुमितनं 80 हजारच्या प्रश्नासाठी 'ऑडियंस पोल' लाइफलाइनचा वापर केला. जेव्हा एक लाख 60 हराज रुपयांचा प्रश्न आला, तेव्हा त्यांना 'दुगनास्त्र' ची पावर मिळाली आणि बोनस अमाउंट जिंकले. सुमित यांनी सांगितलं की या पैशांनी ते त्यांच्या आईला वैष्णो देवीच्या दर्शनाला पाठवतील.
सुमित यादव यांना देण्यात आलेल्या लाइफलाइनचा वापर केल्यानं त्यांना 12 लाख 50 हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंत ते पोहोचू शकले. या प्रश्नापर्यंत त्यांच्याकडे दोन लाइफलाइन होत्या. प्रश्न हा होता की महाभारतानुसार, खालील दिलेल्यापैकी कोणी भीम यांच्यासाठी ते पेय पदार्थ उपलब्ध करुन दिलं जे त्यांना एक हजार हत्तीची ताकद देत होतं? आता सुमित हे काय उत्तर देत आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
हेही वाचा : लग्नाच्या वाढदिवसानिमित्तं आमिरच्या जावयानं शाल, श्रीफळ देत केला पत्नी इराचा सत्कार
सुमित यादव यांनी सगळ्यात आधी 'व्हिडीओ कॉल ए फ्रेंड' ही लाइफलाइन वापरली. मग बऱ्याच काळानंतर विचार करत राहिले आणि अखेर त्यांनी उरलेली 'डबल डिप' ही लाइफलाइन देखील वापरली. त्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी ऑप्शन B) वरुण देवानं निवडलं तर त्यानंतर लगेच A)देवी गंगा निवडली. पण त्यांनी दिलेली दोन्ही उत्तर ही चुकिची निघाली. अशा प्रकारे सुमित यादव यांनी फक्त 3 लाख 20 हजार रुपये जिंकले.