Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल

Rohit Sharma: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायरासोबत दिसतोय. वडील आणि लेक दोघेही समुद्रकिनारी बसलेले दिसतात.

सुरभि जगदीश | Updated: Jun 14, 2024, 09:24 AM IST
Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल title=

Rohit Sharma: टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करतेय. आतापर्यंत टीम इंडियाने 3 सामने खेळले असून या सर्व सामन्यांत विजय मिळवला आहे. भारतासाठी लीग स्टेजमधील शेवटचा सामना बाकी असून तो कॅनडासोबत असणार आहे. 15 जून रोजी हा सामना खेळवला जाणार असून यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याची मुलगी समायरा सोबत वेळ घालवताना दिसतोय. 

T20 वर्ल्डकप 2024 मध्ये टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करतेय. रोहितने पहिल्याच सामन्यात 52 रन्सची उत्तम खेळी केली. आता 15 जून रोजी कॅनडाविरुद्धच्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात तो पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करू इच्छितो. यापूर्वी हिटमॅन आपल्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसतोय. ज्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

रोहित-समायराची मस्ती

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायरासोबत दिसतोय. वडील आणि लेक दोघेही समुद्रकिनारी बसलेले दिसतात. एका फोटोमध्ये रोहित आपल्या मुलीला उचलून खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोमध्ये भारतीय कर्णधार आपल्या मुलीसोबत समुद्रकिनारी बसून वाळूशी खेळताना दिसतोय. चाहत्यांना हिटमॅनचे हे फोटो आवडले असून कमेंट्स करतायत.

रोहित शर्मा आणि त्याच्या मुलीचे हे फोटो पाहून त्याचे चाहते खूप खुश दिसत आहेत. या पोस्टवर चाहते विविध कमेंट करत आहेत. रोहितने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. यादरम्यान रोहितने कॅप्शनमध्ये एक मासा आणि हसणारा इमोजी पोस्ट केला आहे. आता रोहितकडून टी-20 वर्ल्डकप 2024 ची ट्रॉफी भारतात आणण्याची भारतीय चाहत्यांची अपेक्षा आहे.

अमेरिकेच्या विजयानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

अमेरिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितले की, हा सामना जिंकणं कठीण जाणार आहे, हे मला माहीत होते. आम्ही ज्या प्रकारे संयम राखला आणि पार्टनरशिप केली केली, त्याचं श्रेय आम्हाला जातं. सूर्या आणि दुबे यांनी शानदार खेळ दाखवत टीमला विजयापर्यंत नेलं. यै ठिकाणी क्रिकेट खेळणं सोप नव्हतं. आम्हाला खेळाच्या अंतापर्यंत टिकून राहणं गरजेचं होतं. या विजयाने आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे.