Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!

Saurabh Netravalkar: अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.

सुरभि जगदीश | Updated: Jun 14, 2024, 08:56 AM IST
Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...! title=

Saurabh Netravalkar: टी-20 वर्ल्डकपमध्ये नुकताच भारत विरूद्ध अमेरिका यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने अमेरिकेचा पराभव केला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अमेरिककेडून खेळत असलेला भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावळकरने गोलंदाजी करताना कमाल केली. टीम इंडियाचे दोन प्रमुख फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना माघारी धाडलं. मात्र या उत्तम कामगिरीनंतरही सौरभ स्वतःवर नाराज असल्याचं दिसून आलं आहे. 

अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेच्या  गोलंदाजांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना खूप मेहनत करायला लावली. अमेरिकन टीमकडून भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावळकरने प्रथम विराट कोहलीला गोल्डन डकचा बळी बनवलं. त्यानंतर रोहित शर्माला अवघ्या 3 रन्सवर माघारी धाडलं.

नेत्रावळकर कोणत्या गोष्टीवरून नाराज?

भारताविरुद्धच्या सामन्यात सौरभ नेत्रावळकरने उत्तम गोलंदाजी केली. यावेळी त्याने 4 ओव्हर्समध्ये 18 रन्स दिले. याशिवाय टीम इंडियाच्या दोन्ही महत्त्वाच्या ओपनर्सना त्याने माघारी धाडलं. पंत आऊट झाल्यानंतर शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी कमान सांभाळली. रनरेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याने 13व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर फोर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र नेत्रावळकरने त्याचा कॅच सोडला. टीम इंडियामध्ये सूर्यासोबत अंडर 15 मध्ये सौरभ खेळला होता. तर आता त्याचा झेल सोडल्याची खंत सौरभच्या मनात आहे. 

सूर्याचा झेल सोडल्यामुळे अमेरिकेचा पराभव झाला असं सौरभला वाटतंय. सूर्याची विकेट गेल्यानंतर टीम इंडियावर दबाव टाकता आला असता, असं सौरभचं म्हणणं आहे.

टी-20 वर्ल्डकपमध्ये स्टार बनला सौरभ

एकेकाळी टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न पाहणारा सौरभ नेत्रावळकर अमेरिकन क्रिकेट टीमसाठी स्टार खेळाडू बनतोय. तो अंडर-19 मध्ये भारताकडून खेळला आहे आणि आता टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळतोय. कॅनडाविरुद्ध त्याला एकही विकेट मिळवता आली नाही पण अमेरिकेच्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या मोठ्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्याने उत्तम गोलंदाजी करत भारताविरुद्ध दबावही निर्माण केला. सॉफ्टवेअर इंजिनीयर सौरभ नेत्रावलकर सध्या ओरॅकलमध्ये काम करतो.