FIFA World Cup : सध्या जगभरात कतारमध्ये (qatar) सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 ची (fifa world cup 2022) चर्चा सुरुय. या वर्ल्ड कप स्पर्धेत सामन्यांसोबत स्टेडियममध्ये होणाऱ्या घटनाही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या संपूर्ण स्पर्धेत कतारने फुटबॉल स्टेडियमच्या आत दारू किंवा बिअरच्या (Beer) विक्रीला परवानगी दिलेली नाही. स्पर्धा सुरु होण्याआधीच हा निर्णय घेतल्याने फुटबॉल प्रेमींमध्ये नाराजी पसरली. पहिल्याच सामन्यात याचा प्रत्यय आला. सामन्यावेळी प्रेक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केलीय आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
32 देशांदरम्यान होत असलेल्या या जागतिक स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने लोक कतारला पोहोचले आहेत. पण या स्पर्धेच्या आयोजनावरुन आता वाद सुरू झाले आहेत. यावेळी फिफा विश्वचषकाच्या (FIFA) सर्व सामन्यांमध्ये मद्याचा वापर केला जाणार नसल्याचे कतारने जाहीर केले आहे. त्यामुळे चाहते चांगलेच संतापले आहेत. याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षक स्टेडियममध्ये बिअरची (beer) मागणी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
स्टेडियममध्ये प्रेक्षक We want beer!असे ओरडताना ऐकू येत आहे. प्रेक्षक स्टेडियममध्ये बिअरची मागणी करू लागले आहेत. आतापर्यंतच्या सर्व वर्ल्ड कप सामन्यांमध्ये प्रेक्षक बिअरचा आस्वाद घेत सामना पाहत आले आहेत. पण यावेळी त्यावर बंदी घालण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अरब देशात या स्पर्धेचे आयोजन होत आहे. कतार हा इस्लामिक देश आहे, त्यामुळे येथे मद्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Ecuadorian fans chanting "Queremos Cerveza!" meaning "We want beer!" during the opening world cup match in Qatar.
Qatar, a Muslim country, initially agreed to allow alcohol sales, then cancelled 2 days before the start.
sound ...#WorldCup #WorldcupQatar2022 pic.twitter.com/FHAn5RMXmH
— Wall Street Silver (@WallStreetSilv) November 21, 2022
बिअर निर्माता कंपनी budweiser या विश्वचषकासाठी स्पॉन्सर आहे त्यामुळे फिफासाठी हा चिंतेचा विषय आहे. budweiserने या स्पॉन्सरशिपसाठी 75 दशलक्ष डॉलर इतकी रक्कम दिली आहे. याआधीही फिफाने केवळ budweiserशी संबंधित उत्पादने घेण्याबाबत बोलले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता.