Pakistan vs England, 2nd Test: इंग्लंड आणि पाकिस्तान (PAK vs ENG) यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये (England beat Pakistan in 2nd test by 26 runs) इंग्लंडने यजमान पाकिस्तानचा पराभव केला आहे. या विजयानंतर बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने 22 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकून (England secure series win) जबरदस्त कामगिरी केली आहे. मुलतान येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात (Pakistan vs England, 2nd Test) इंग्लंडने पहिल्या डावात 281 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 275 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 355 धावांचे लक्ष्य ठेवलं. मात्र, अखेर पाकिस्ताला अखेर 328 धावांवर समाधान मानावं लागलं. मार्क वूडने (Mark Wood) घातक गोलंदाजी करत दुसऱ्या डावात 4 गडी तंबूत पाठवले. (England secure series win after beat Pakistan in 2nd test by 26 runs sports marathi news)
The ball that ended Saud Shakeel's fantastic innings. #PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/kssvis9RdH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 12, 2022
तीन सामन्याची मालिकेतील (Pakistan vs England, 3rd Test) अखेरचा सामना येत्या 17 डिसेंबरला खेळला जाणार आहे. कराचीमध्ये (karachi) हा सामना रंगणार असल्याने पाकिस्तानला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेच लाज राखण्याचं लक्ष्य बाबर सेनेचं असणार आहे.
दरम्यान, सध्याच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (Eng Beat Pak in test series after 22 years) इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली. टीम इंग्लंडने 22 वर्षांनंतर पाकिस्तानच्या जमिनीवर कसोटी मालिका जिंकली आहे. यापूर्वी 2000-2001 मध्ये पाकिस्तानमध्ये इंग्लंडने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली होती. त्यानंतर आता मोठा भीमपराक्रम इंग्लंडने केला आहे.