BAN vs IND: BCCI ने मारली स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड; करियर पणाला लागलेल्या खेळाडूले केलं vice-captain

पहिल्याच सामन्यापूर्वी बीसीसीआने टीम इंडियामध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. त्यांनी कर्णधारपद के.एल राहुलकडे सोपवलं, तर उपकर्णधार अशा व्यक्तीकडे सोपवण्यात आलं आहे, ज्याचं स्वतःच करियर पणाला लागलं आहे.

Updated: Dec 12, 2022, 04:25 PM IST
BAN vs IND: BCCI ने मारली स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड; करियर पणाला लागलेल्या खेळाडूले केलं vice-captain title=

Cheteshwar Pujara new vice captain : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यादरम्यान दोन सामन्याची टेस्ट सिरीज (IND vs BAN Test Series) खेळवली जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना 14 डिसेंबरपासून चटगावमध्ये खेळवला जाणार आहे. अशावेळी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियामध्ये अनेक बदलाव केले आहेत. अनेक खेळाडू दुखापतींमुळे टीम इंडियाच्या बाहेर गेले असून यामध्ये कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) देखील समावेश आहे. 

दरम्यान पहिल्याच सामन्यापूर्वी बीसीसीआने टीम इंडियामध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. त्यांनी कर्णधारपद के.एल राहुलकडे सोपवलं, तर उपकर्णधार अशा व्यक्तीकडे सोपवण्यात आलं आहे, ज्याचं स्वतःच करियर पणाला लागलं आहे.

या खेळाडूकडे दिली उपकर्णधारपदाची धुरा

14 डिसेंबरपासून बांगलादेश (IND vs BAN) पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. यावेळी रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्यात के.एल राहुलला कर्णधारपद देण्यात आलंय. तर उपकर्णधार म्हणून बीसीसीआयने चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) नियुक्ती केली आहे. 

पुजाराचं करियर जवळपास संपण्याचा मार्गावर

चेतेश्वर पुजाराला उपकर्णधार पद देऊन बीसीसीआयने सर्वांनाच हैराण केलं आहे. बीसीसीआयने अशा व्यक्तीच्या हातात उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे, ज्याचं करियर आता संपण्याच्या मार्गावर आहे. या खेळाडूचा परफॉर्मन्स पाहता, त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून केली नाही सेंच्युरी

चेतेश्वर पुजाराला उपकर्णधार बनवल्याने सर्वजण हैराण झाले आहे. गेल्या टेस्टमध्ये पुजारा काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याशिवाय टीममध्ये त्याची जागा निश्चित नाही. इंग्लंडविरूद्ध झालेल्या टेस्टमध्येही त्याने खास कामगिरी केली नव्हती. 

पुजाराने त्याचं शेवटच शतक जानेवारी 2019 मध्ये केलं होतं. ज्यानंतर त्याला मोठी खेळी करता आली नाही. चेतेश्वर पुजाराच्या जागी इतर खेळाडू खेळण्यासाठी तयार आहेत. अशातच त्याला बीसीसीआयने उपकर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी.