मुंबई : टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या ऑलराउंडर खेळाडूला सामन्यादरम्यान जबर दुखापत झाली आहे. सामन्यादरम्यान थेट मानेवर बॉल आदळल्याने मैदानात थेट Ambulance बोलवावी लागली. त्यामुळे खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांचीही धाकधूक वाढलीय. (duleep trophy central zone vs west zone chintan gaja wrong throw and bowl hit allrounder venkatesh iyer neck)
टीम इंडियाच्या घातक ऑलराऊंडर (Venkatesh Iyer) मोठा दुर्घटनेचा शिकार झाला आहे. कोयंबटूरमध्ये हा सामना खेळवण्यात येत होता. या सामन्यादरम्यान बॉल थ्रो करण्यात आला. दुर्देवाने थ्रो सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या वेंकटेश अय्यरच्या मानेवर लागला. वेंकटेश बॉल मानेवर लागताच जमिनीवर कोसळला. अय्यर जमिनीवर कोसळल्यावर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दुलीप ट्रॉफी सिरीजमध्ये (Duleep Trophy) सेंट्रल झोन आणि वेस्ट झोनमध्ये सामना सुरू होता. कोयंबटूरच्या एसएनआर कॉलेजच्या क्रिकेट ग्राऊंडवर हा सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. फलंदाजी करताना नाही, तर गोलंदाज चिंतन गाजाच्या चुकीच्या थ्रोमुळे अय्यर (Venkatesh Iyer) जखमी झाला.
Venkatesh Iyer is hit on the neck by Chintan Gaja’s throw and limps off the field in pain.https://t.co/thvlk4DFdT pic.twitter.com/g1O8F0dpH9
— indira ghosh (@indirag63776153) September 16, 2022
अय्यर जमिनीवर कोसळला...
चिंतन गाजाच्या थ्रोमुळे अय्यरला सावरण्याची संधी देखील मिळाली नाही. चेंडू अय्यरच्या मानेवर बसला. अय्यर (Venkatesh Iyer) चेंडू लागल्यावर हेल्मेट काढता काढता जमिनीवर कोसळला. अय्यरला चेंडू लागल्याचं पाहून इतर खेळाडू अय्यरकडे धावत आले. लगोलग मेडिकल टीम देखील मैदानात पोहचली मात्र, दुखापत गंभीर असल्याचं लक्षात आल्यावर त्याला रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
अय्यरची स्थिती पाहता मैदानावरच रुग्णवाहिका बोलवण्यात आली. अय्यरची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुन्हा खेळण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. मैदानात परतल्यावर अय्यरला (Venkatesh Iyer) मोठी खेळी खेळता आला नाही. 14 धावा करत अय्यर तंबुत परतला. त्यामुळे सेंट्रल झोनचा डाव फक्त 128 धावांवर आटोपला.