4 दिवसानंतर टीम इंडिया-पाकिस्तानचा सामना, टी 20 सीरिजमध्ये भिडणार

आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे कट्टर प्रतिस्प्धी दोनदा आमनेसामने आले होते.  

Updated: Sep 16, 2022, 05:33 PM IST
 4 दिवसानंतर टीम इंडिया-पाकिस्तानचा सामना, टी 20 सीरिजमध्ये भिडणार  title=

मुंबई : आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे कट्टर प्रतिस्प्धी दोनदा आमनेसामने आले. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये बाजी मारली. तर पाकिस्तानने सुपर 4 मध्ये विजय मिळवत पराभवाचा वचपा घेतला.  आता हे दोन्ही टीम्स आणि त्यांचे चाहते आगामी टी 20 र्वल्ड कपची आवर्जुन वाट पाहतायेत.  या वर्ल्ड कपमध्ये 23 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. या हायव्होल्टेज मॅचसाठी क्रिकेटचाहते उत्सूक झालेत. मात्र, वर्ल्ड कपआधी  एकमेकांविरुद्ध मोहीम सुरू करण्यापूर्वी दोन्ही कडवट प्रतिस्पर्धी टी-20 सीरिज खेळणार आहेत. या मालिकेला 20 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.(pakistan vs england and india vs australia 1st t20i play same day on 20 september 2022)

टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया (Australia tour of India 2022 ) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरिज (South Africa tour of India 2022) खेळणार आहे. या दोन्ही मालिकांकडे वर्ल्ड कपची रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे. टीम इंडिया 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबरला मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. त्याच दिवशी पाकिस्तान 7 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडविरुद्ध कराचीत खेळणार आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिज संपल्यानंतर बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध ट्राईंगुलर सीरीज खेळणार आहे.  
   
टीम पाकिस्तान : बाबर आझम, शादाब खान, आमिर जमाल, अबरार अहमद, आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हैरिस, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शहनवाज दहानी, शान मसूद आणि उस्मान कादिर.  

टीम इंडिया स्कॅवड : रोहित शर्मा, केएल राहुल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल आणि सूर्यकुमार यादव.