खराब कामगिरीनंतरही CSKला हवा धोनीच; ब्रायन लाराने सांगितलं कारण

धोनीचा सध्याचा परफॉर्मन्स पाहता धोनीला सीएसकेने पुन्हा रिटेन करावं का याबाबत प्रश्न आहे. 

Updated: Oct 9, 2021, 03:18 PM IST
खराब कामगिरीनंतरही CSKला हवा धोनीच; ब्रायन लाराने सांगितलं कारण title=

मुंबई : महेंद्र सिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जसाठी एक यशस्वी कर्णधार राहिला आहे. दरम्यान यंदाच्या आयपीएल दरम्यान त्याने पुन्हा आपण पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार का याबाबत माहिती नसल्याचं सांगितलं होतं. मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रेंचायजींना धोनी त्यांच्यासोबत हवा आहे.

मात्र धोनीचा सध्याचा परफॉर्मन्स पाहता धोनीला सीएसकेने पुन्हा रिटेन करावं का याबाबत प्रश्न आहे. यावर वेस्टइंडिजचा माजी खेळाडू ब्रायन लाराने त्याचं मत व्यक्त केलं आहे. ब्रायन लाराच्या म्हणण्याप्रमाणे, सीएसकेने पुढच्या वर्षी आपला कर्णधार धोनी कायम ठेवला पाहिजे.

लारा म्हणाला की, एमएस धोनी आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटचे सर्वात मोठे ब्रँड आहेत. क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना तो म्हणाला की, धोनीने या मोसमात आपल्या टीमसाठी फलंदाजीत चांगली कामगिरी केली नसली तरी त्याचा प्रवास अजून संपलेला नाही.

ब्रायन लाराला विश्वास आहे की CSK नक्कीच त्यांचा कर्णधार कायम ठेवेल. तो म्हणाला की, 2022 च्या आयपीएलमध्ये एमएस धोनीशिवाय सीएसके पाहणं खूप कठीण असेल. त्यामुळे माझा विश्वास आहे की ब्रँड आणि धोनीने आयपीएलमध्ये काय आणलं आहे हे लक्षात घेऊन, जर त्यांना खेळाडू कायम ठेवण्याची गरज असेल तर सीएसके त्यांना कायम ठेवेल.

महेंद्रसिंग धोनी 2008 पासून CSK संघाचा भाग आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने तीन वेळा जेतेपद पटकावलं आहे आणि त्याने या संघासाठी आतापर्यंत खेळलेल्या 218 सामन्यांमध्ये 4728 धावा केल्या आहेत.