धनश्री वर्माने 'चहल' आडनाव काढून टाकल्यानंतर केली पहिली पोस्ट, म्हणाली, "आपलं दु:ख.."

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात नेमकं काय सुरु आहे? याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

Updated: Aug 18, 2022, 06:02 PM IST
धनश्री वर्माने 'चहल' आडनाव काढून टाकल्यानंतर केली पहिली पोस्ट, म्हणाली, "आपलं दु:ख.."  title=

Dhanashree Verma Instagram Post: टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात नेमकं काय सुरु आहे? याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दोघांनी केलेल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनश्रीने बुधवारी तडकाफडकी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून चहल अडनाव नाव हटवले आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असं असताना धनश्रीच्या आणखी एका इंस्टाग्राम पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने लिहिलेली पोस्ट वाचून नक्कीच काहीतरी बिनसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धनश्री वर्माने 'चहल आडनाव' काढून टाकल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिचे दोन फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक राजकुमारी कायम तिच्या वेदनांचं शक्तीत रुपांतर करेल.' या पोस्टद्वारे तिने वेदना होत असल्याचे संकेत दिले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 3 महिन्यांच्या नात्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर 22 डिसेंबर 2020 मध्ये विवाहाच्या अतूट बंधनात बांधले गेले. धनश्री वर्मा डान्स कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट देखील आहे. धनश्री वर्माचे नृत्याशी संबंधित एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलचे 26 लाखांहून अधिक सदस्य आहेत. धनश्री बॉलीवूड गाणी रिक्रिएट करते. धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. युझवेंद्र चहलसोबत डान्सचे व्हिडिओही शेअर करत असते.