Dhanashree Verma चा सीक्रेट लव्हर आला समोर, फोटोने सोशल मीडियावर एकचं खळबळ

धनश्री वर्मा आणि य़ुझवेंद्र चहलच्या नात्यातील दुराव्यास 'हा' सीक्रेट लव्हर होता जबाबदार ? कोण आहे हा धनश्रीचा सीक्रेट लव्हर?

Updated: Sep 30, 2022, 11:05 PM IST
Dhanashree Verma चा सीक्रेट लव्हर आला समोर, फोटोने सोशल मीडियावर एकचं खळबळ  title=

मुंबई : टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या नात्यात काही महिन्यापुर्वी दुरावा आल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. मात्र त्यावेळी या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे कारण समोर आले नव्हते. मात्र आता हे कारण समोर आले आहे. तसेच धनश्री वर्माच्या सीक्रेट लव्हरही समोर आला आहे. हा सीक्रेट लव्हर कोण आहे, तो जाणून घेऊयात.  

धनश्री वर्माने (Dhanashree Verma) नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, जी प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये धनश्री वर्माने तिच्या सिक्रेट लव्हरचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर खुप सुरू आहे. 

पोस्टमध्ये काय? 
धनश्री वर्माने (Dhanashree Verma) नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या डॉगी कॉफीसोबत दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा कुत्रा कॉफीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत ती कॅप्शनमध्ये लिहते की, लांब केस सेट करण्यापासून मूड बदलण्यापर्यंत एकच मुद्दा आहे, तु माझा सीक्रेट लव्हर आहे, आणि नेहमी राहशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा कॉफी.

धनश्री वर्माने (Dhanashree Verma) तिच्या कुत्र्याचे वर्णन आपला सीक्रेट लव्हर असे केले आहे. त्यामुळे तिच्या या सीक्रेट लव्हरची चर्चा सुरू झाली होती. यासोबतच हा सीक्रेट लव्हर तर नात्यात दुरावा येण्याचे कारण नव्हतं ना, अशीही चर्चा आहे. 

दरम्यान काही दिवसांपुर्वीच धनश्री वर्माने (Dhanashree Verma)आपल्या सोशल मीडिया हँडलवरून चहलचे नाव काढून टाकले होते. हे पाहून या जोडप्याच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, धनश्री वर्माच्या (Dhanashree Verma) विभक्त झाल्याच्या अफवेनंतर दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्पष्टीकरण दिले. त्यानंतर या चर्चांना पुर्णविराम मिळाला होता.