प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीचा जबरदस्त डान्स, नोराला ही दिली टक्कर, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावरती बरेच लोकं प्रसिद्ध गाण्यावरती डान्स करतात आणि आपल्यातील कला दाखवतात.

Updated: Dec 31, 2021, 06:40 PM IST
प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीचा जबरदस्त डान्स, नोराला ही दिली टक्कर, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : डान्सच्या विश्वात नोरा फतेहीने आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. नोराचा डान्स म्हटलं की सगळ्यांना तिच्या घायाळ करणाऱ्या अदा आठवतात. सध्या नोराचा 'डान्स मेरी राणी' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. लोकांनी त्याला जबरदस्त पसंती देखील दर्शवली आहे. तसेच या गाण्यात नोराने आपला जबरदस्त डान्स मुव्हस केल्या आहेत. सध्या सोशल मीडियवर देखील नोराचं हे गाण ट्रेंड करत आहेत. तसेच या गाण्यातील नोराच्या ड्रेसने देखील चाहत्यांना वेड लावलं आहे.

सोशल मीडियावरती बरेच लोकं प्रसिद्ध गाण्यावरती आपला डान्स दाखवतात, तसेच लोकं नोराच्या 'डान्स मेरी राणी' या गाण्यावर देखील आपला डान्स आणि आपल्यातील कला दाखवत आहेत. 

अशातच टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने देखील आपला डान्स दाखवला आहे. आपल्याला हे माहित आहे की धनश्री वर्माही उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. धनश्रीचे सोशल मीडियावरती लाखो फॉलोअर्स आहेत आणि लोकांना तिचा डान्स फार आवडतो. लोकं तिच्या डान्सचं कौतुक देखील करतात.

धनश्री वर्माने आपला एक डान्स शेअर केला आहे. ज्यामध्ये ती नोराचं गाणं डान्स मेरी राणीवरती डान्स करत आहे. तिचा डान्स आणि तिच्या अदा लोकांना फार आवडल्या आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सही उत्स्फूर्तपणे येत आहेत.

धनश्री वर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा जबरदस्त डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये धनश्रीने हिरव्या रंगाची पँट घातली आहे. धनश्री तिच्या मोकळ्या केसांमध्ये नाचत आहेत.

हा व्हिडीओ पोस्ट करताना धनश्रीने कमेंट केली की, 'वर्षांचा शेवटचा दिवस आहे. आणि पुढे छोटा हार्ट ठेवला आहे. पुढे तिने लिहिले की, मला आशा आहे की 2022 मध्ये आपण सर्व आनंदाने नाचत राहू. फक्त आपल्या प्रियजनांसोबत रहा आणि प्रत्येक प्रकारे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. लव्ह यू गाईज...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओवर कमेंट करताना चाहते धनश्रीच्या डान्सचे कौतुक करत आहेत, काही युजर्सनी तिचा डान्स नोरापेक्षा चांगला असल्याचेही म्हटले आहे. धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो आणि डान्स व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतेच धनश्रीने नृत्यासोबतच तिचे गायनाचे कौशल्यही चाहत्यांना दाखवले आहे. अभिषेक बच्चन-करीना कपूर यांचं 'मेरे हमसफर मेरे' हे गाणं तिने संगीतबद्ध केलं होतं. क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर तसेच डेंटिस्ट आहे.