निवृत्तीनंतर हरभजन सिंगचे कॅप्टन कूल धोनीवर गंभीर आरोप

निवृत्तीनंतर हरभजन सिंगचे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप, म्हणाला... 'त्याच्यामुळे माझी....'

Updated: Dec 31, 2021, 04:46 PM IST
निवृत्तीनंतर हरभजन सिंगचे कॅप्टन कूल धोनीवर गंभीर आरोप  title=

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच संन्यास घेतला आहे. त्यानंतर हरभजन सिंगने आपल्या मनातील सल व्यक्त करत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर आरोप केले आहेत. संन्यास घेतल्यानंतर आता हरभजन सिंगने कोणतीही भीती मनात न ठेवता आता समोर येऊन काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

हरभजन सिंगने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर गंभीर आरोप केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार कोणत्याही कारणाशिवाय टीम इंडियामधून बाहेर करण्यात आलं होतं. 

2011 च्या वर्ल्ड कपनंतर हरभजन सिंगने फक्त 10 वनडे आणि 10 कसोटी सामने खेळले. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2015 च्या वर्ल्ड कपसाठीही हरभजन सिंगला संघात स्थान देण्यात आलं नव्हतें. महेंद्रसिंग धोनीमुळे रविचंद्रन अश्विनला टीम इंडियाला जागा मिळाली. 

रविचंद्रन अश्विन टीम इंडियात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हरभजन सिंगला विशेष खेळण्याची संधी मिळाली नाही. हरभजन सिंगऐवजी आर अश्विनला कायम धोनीनं प्राधान्य दिलं. याचा राग हरभजन सिंगने निवृत्तीनंतर धोनीवर गंभीर आरोप करून काढला आहे.