Dinesh Karthik Video : आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) खेळणाऱ्या दिनेक कार्तिकने (Dinesh Kartik) यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली. लीगमध्ये सलग सहा सामने जिंकत बंगळुरुने आयपीएलच्या प्ले ऑफमध्येही (IPL Play Off) धडक मारली. पण प्ले ऑफमध्ये राजस्थान रॉयल्सकडून बंगळुरुला पराभवाचा धक्का बसला. या सामन्यानंतर बंगळुरुचा विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने आयपीएलमधून (IPL 2024) निवृत्ती जाहीर केली. आयपीएलमच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून दिनेश कार्तिक आयीएलमध्ये खेळतोय.
दिनेश कार्तिकने निवडला नवा खेळ?
आयपीएलमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर दिनेश कार्तिक का करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान दिनेश कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून दिनेश कार्तिकने क्रिकेटनंतर आता नवा खेळ निवडला का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिनेक कार्तिक भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राबरोबर (Neeraj Chopra) दिसतोय. कार्तिक आणि नीरजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या व्हिडिोत दिने कार्तिक भालाफेकीचा जोरदार सराव करताना दिसत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दिनेश कार्तिक भालाफेकीचा सराव करताना दिसत आहे. तर नीरज चोप्रा त्याला मार्गदर्शन करतानाही दिसतोय. वास्तविक नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक 2024 शी संबंधीत एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्याआधी त्याने ऑलिम्पिकसाठी तयारी करणाऱ्या भारतीय अॅथलेटिक्स खेळाडूंची भेट घेतली. त्यांची तयारी कशी सुरु आहे, कशी मेहनत घेत आहेत याची माहिती दिनेश कार्तिकने घेतली. याचवेळी त्याची नीरज चोप्राबरोबर भेट झाली. या भेटीत दोघांनी पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीबद्दल चर्चा केली.
यावेळी दिनेश कार्तिकने नीरज चोप्राच्या मार्गदर्शनाखाली भाला फेकला. कार्तिकने किती दूरवर भाला फेकला याची माहिती व्हिडिओत देण्यात आलेली नाही.
Dinesh Karthik, the Javelin thrower #Olympics #ParisOlympics2024 #IPL2024 #T20WorldCup pic.twitter.com/7nU3I8Imk3
— Dinesh Karthik Fan Club (@DKFANFOREVER) May 28, 2024
कार्तिकची आयपीएलमधली कामगिरी
आयपीएल 2024 मध्ये दिनेश कार्तिकने दमदार कामगिरी केली. कार्तिक आरसीबीसाठी 15 सामने खेळला यात त्यने 326 धावा केल्या. कार्तिकने दोन अर्धशतकंही झळकावली. यंदाच्या आयपीएलमध्ये कार्तिकची सर्वोत्तम धावसंख्या 83 होती. कार्तिक आयपीएलमध्ये एकूण 257 सामने खेळला आहे. यात त्याने 3577 धावा केल्या असून तब्बल 22 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये कार्तिकला एकही शतक झळकावता आलेलं नाही. आयपीएलमध्ये कार्तिकच्या नावावर 466 चौकार आणि 161 षटकार जमा आहेत.