KL Rahul Ruled Out from IPL 2023: टीम इंडियाच्या मिशन 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला' (World Test championship) मोठा धक्का बसला आहे. आयपीएल सुरु असतानाच टीम इंडियासाठी (Team India) ही मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडला आहे. इतकंच नाही तर पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही केएल राहुल खेळू शकणार नसल्याचं समोर आलं आहे. दुखापतीमुळे के एल राहुल आयपीएल आणि WTC स्पर्धेला मुकणार आहे.
केएल राहुल दुखापतग्रस्त
आयपीएलमध्ये बंगलोरविरुद्धच्या (RCB) सामन्यात केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. फिल्डिंग करताना केएल राहुलच्या मांडीला दुखापत झाली. यानंतर त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. केएल राहुलबरोबरच संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटही दुखापीतमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. मार्कस स्टॉइनिसच्या गोलंदाजीवर फाफ डू प्लेसिसने कव्हर ड्राईव्ह मारला. यावेळी बाऊंड्रीजवळ चेंडू अडवताना केएल राहुलने उडी मारली. यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याचं संघ व्यवस्थापनाने सांगितलं. त्यामुळे पुढच्या महिन्यात 7 ते 11 जून दरम्यान लंडनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केएल राहुल सध्या लऊनऊ सुपर जायंट्स संघाबरोबर आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर तो मुंबईत येईल. इथे बीसीसीआयच्या वैद्यकिय पथकाकडून त्याची तपासणी केली जाईल. केएल राहुलच्या दुखापतीमुळे लखनऊ संघाला मोठा धक्का बसला आहे. लखनऊने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये पाच विजय मिळवले आहेत. तर चार सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पॉईंटटेबलमध्ये लखनऊ तिसऱ्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनऊला पुढचे सर्व सामने जिंकवाले लागणार आहेत.
बीसीसीआयची प्रतिक्रिया
केएल राहुल हा टीम इंडियाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे. त्यामुळे दुखापतीतून लवकर सारवरण्यासाठी आयपीएलमध्ये पुढच्या सामन्यात त्याला विश्रांती देणं योग्य राहिल, वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या दुखापतीचं गंभीरता स्पष्ट होईल त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
उनाडकटची दुखापतही गंभीर
दुसरीकडे जयदेव उनाडकटची दुखापतही गंभीर असल्याचं बोललं जातंय. जयदेवच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सुदैवाने त्याचा खांदा डिसलोकेट झाला नसल्याचं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. पण सध्या तो आयपीएल खेळू शकणार नाही.