कानपूर टेस्ट दरम्यान पावसाची बॅटिंग, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, बांगलादेशची आघाडी

IND VS BAN 2nd Test : कानपूरमध्ये शुक्रवार 27 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येत आहे. परंतु सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने स्टेडियमवर तुफान बॅटिंग केल्याने दुपारी 2 च्या सुमारास पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. 

पुजा पवार | Updated: Sep 27, 2024, 05:14 PM IST
कानपूर टेस्ट दरम्यान पावसाची बॅटिंग, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, बांगलादेशची आघाडी   title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील पहिला सामना हा चेन्नईत पार पडला होता यात टीम इंडियाने 280 धावांनी सामना जिंकून घेऊन सीरिजमध्ये 1-0  ने आघाडी घेतली. कानपूरमध्ये शुक्रवार 27 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येत आहे. परंतु सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने स्टेडियमवर तुफान बॅटिंग केल्याने दुपारी 2 च्या सुमारास पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. 

टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय : 

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात दुसऱ्या टेस्ट सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. सामन्याच्या सुरुवातीला भारत बांगलादेश यांच्या कर्णधारांमध्ये झालेला टॉस टीम इंडियाने जिंकला. कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. रोहितच्या या निर्णयावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण 1964 नंतर तब्बल 60 वर्षांनी कानपूर्ण येथे  टेस्ट सामन्यादरम्यान टीम इंडियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. होता. परंतु स्टेडियमवर गुरुवारी पाऊस पडल्याने मैदानाची स्थिती पाहून आपण गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचे रोहितने सांगितले. 

अश्विनने रचला इतिहास : 

 

बांगलादेशकडून प्रथम फलंदाजीसाठी झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांची सलामी जोडी उतरली. यावेळी आकाश दीपने झाकीर हसनला डक आउट केले. 24 बॉल खेळूनही झाकीरला एकही धाव करता आली नाही. मग आकाशने शादमान इस्लाम याला सुद्धा एलबीडब्ल्यू आउट केले. तर 29 व्या ओव्हरला अनुभवी गोलंदाज आर अश्विनने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याची विकेट घेतली. यासह अश्विनने आशियायी खेळपट्टीवर 420 विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला. अशी कामगिरी करणारा अश्विन हा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे यांनी  आशियायी खेळपट्टीवर भारताकडून खेळताना 419 धावा घेतल्या होत्या.

हेही वाचा : कानपूर कसोटीदरम्यान बांगलादेशच्या फॅनला मारहाण? पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं

बांगलादेशची धावांची आघाडी : 

35 वी ओव्हर पूर्ण होता होताच स्टेडियम परिसरात पावसाळा सुरुवात झाली. काहीकाळ पाऊस थांबून खेळ सुरु होईल याची वाट पाहण्यात आली परंतू तसे झाले नाही. पावसाचा जोर वाढला ज्यामुळे संपूर्ण मैदान हे कव्हर्स टाकून झाकण्यात आले. त्यानंतर अंपायर्सनी पहिल्या दिवसाचा सामना इथेच थांबण्यात येत असल्याचा निर्णय घेतला. दिवसाअंती टीम इंडियाने बांग्लादेशच्या 3 विकेट्स घेतल्या असून बांगलादेशने 107 धावांची आघाडी घेतली आहे. 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज

बांगलादेशची प्लेईंग 11 :

शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद