मुंबई : 2021 टी-20 वर्ल्डकप हरल्यानंतर इंडिया टीममध्ये मोठे बदल केले गेले. टीमच्या कर्णधारपदाची धुरा आता रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. जेव्हापासून रोहितने टीमची कमान सांभाळलीये तेव्हापासून टीम उत्तम काम करतेय. मात्र यावेळी माजी कर्णधार विराट कोहलीच्या लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी टीमवर टीका केली आहे. शर्मा यांच्या सांगण्याप्रमाणे, टीम अजूनही टी-20 वर्ल्डकप 2022 साठी पूर्णपणे तयार नाहीये.
सध्या टीम इंडिया खूप उत्तम कामगिरी करत असून गेल्या 1 सामन्यांमध्ये टीमने विजय मिळवला आहे. मात्र यावेळी राजकुमार शर्मा म्हणाले, "मला नाही वाटत की टीम अजून पूर्णपणे तयार नाहीये. टीमला अजून पूर्ण तयार व्हावं लागेल. टीममध्ये अनेक खेळाडू अनफिट आहेत तर काहींना आराम दिला जातोय. कधी बुमराह खेळत नाही तर कधी विराट. रोहित देखील आताच फीट झाला आहे."
भारताने नुकतंच श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजलाही वनडे आणि टी-20 या दोन्ही फॉर्मेटमध्ये व्हाईट वॉश देण्यात आला होता. श्रीलंकेविरूद्धच्या तिन्ही टी-20 सिरीजमध्ये श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली होती. त्याच्या फलंदाजीमुळे टीमला मजबुती मिळाली होती.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 फॉर्मेटमघ्ये मध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तान आणि रोमानियाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. टीम इंडियाचा टी-20मधला हा सलग 12वा विजय ठरला.