आयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू इंग्लंडमध्ये भारताच्या विजयासाठी करतोय सराव

आयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू भारताच्या विजयासाठी करतोय तयारी

shailesh musale Updated: Apr 9, 2018, 12:55 PM IST
आयपीएल सुरु असतांना देखील हा खेळाडू इंग्लंडमध्ये भारताच्या विजयासाठी करतोय सराव title=

मुंबई : भारतात आयपीएलची सुरुवात झाली आहे. क्रिकेट फॅन्स आयपीएलचा आनंद घेत आहे. २७ मे पर्यंत आयपीएल चालणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियासाठी हा दौऱा कठीण असणार आहे. इंग्लंडची पिच ओळखणे भारतीयांसाठी कठीण असणार आहे.

एकीकडे टीम इंडियाचे अधिक खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त आहेत तर दुसरीकडे टीम इंडियाचा मध्यक्रमातील खेळाडू चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतो आहे. आयपीएलनंतर जुलैमध्ये टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाईल तेव्हा पुजारासाठी ही खेळपट्टी नवीन नसेल. तो आतापासूनच सराव करतो आहे.

चेतेश्वर पुजाराला आयपीएलमध्ये कोणत्याच टीमने घेतलं नाही. त्याने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये तो सरावासोबतच भारताच्या विजयाची स्क्रिप्ट देखील लिहित आहे. भारतीय टीमसाठी याचा खूप फायदा होईल. भारताकडून तो चांगली कामगिरी करु शकेल.

आफ्रिका दौऱ्याआधी आणि नंतर अनेक तज्ज्ञांनी खेळाडूंना सल्ला दिला होता की त्यांनी काऊंटी क्रिकेट खेळलं पाहिजे. ज्यामुळे येणाऱ्या दौऱ्यांमध्ये ते चांगली कामगिरी करु शकतील. सगळे खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त आहे पण पुजारा इंग्लंडमध्ये आगामी दौऱ्याची तयारी करतो आहे.

विराट कोहली देखील आयपीएलनंतर काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे. याशिवाय टीममधील दुसरे खेळाडू देखील इंग्लंडला लवकर जाणार आहेत. पण पुजारा तेथे बऱ्याच वेळेपासून खेळतोय. त्यामुळे याचा फायदा नक्कीच भारतीय टीमसाठी होणार आहे.