चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचे सेमीफायनलचे लक्ष्य

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरोधात विजयी सलामी दिल्यानंतर टीम इंडिया दुस-या लढाईसाठी सज्ज झालीय. इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात मॅच रंगणार आहे. 

Updated: Jun 8, 2017, 07:46 AM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचे सेमीफायनलचे लक्ष्य title=

ओव्हल : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरोधात विजयी सलामी दिल्यानंतर टीम इंडिया दुस-या लढाईसाठी सज्ज झालीय. इंग्लंडच्या द ओव्हल मैदानावर टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात मॅच रंगणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही आघाड्यांवर भारताने चांगली कामगिरी केली होती. 

पहिल्या सामन्यातील दमदार विजयामुळे टीम इंंडियाचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यामुळे या सामन्यात त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. दुसरीकडे श्रीलंकेला मात्र अद्याप या स्पर्धेत विजयाची चव चाखता आलेली नाहीये. द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यांना ९६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 

पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज खेळला नव्हता. मात्र तो आता दुखापतीतून सावरल्याने टीम इंडियाविरुद्धच्या आजच्या सामन्यात खेळणार आहे की नाही याबाबत अद्याप निश्चिती नाहीये. 

आफ्रिकन बॅट्समन्सनी श्रीलंकन बॉलर्सची धुलाई करत तीनेशहून अधिक रन्स काढले होते. त्यामुळे मलिंगा व्यतिरिक्त फारसा अनुभव नसणा-या लंकन बॉलर्सचा भारतीय बॅट्समनपुढे कस लागणार आहे. ही मॅच जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित करण्याची भारताला संधी आहे.