IND vs NZ : भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) ने उत्तम खेळी केली. सूर्याच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडसमोर मोठं लक्ष्य ठेवलं. सूर्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला चांगला खेळ करता आला नाही. दरम्यान या सामन्यात सलामीला उतरलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan) एका शॉटची सगळीकडे चर्चा होतेय.
इशानने आजच्या सामन्यात काही चांगले शॉट खेळले. मात्र यावेळी त्याने खेळलेल्या शॉटमुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना इतकी मोठी झाली असती की, समोर खेळत असलेल्या सूर्यकुमारला मैदान सोडावं लागलं असतं.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने पुन्हा एकदा त्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. दरम्यान या सामन्यात टीम इंडिया फलंदाजी करताना एक घटना घडली. भारताच्या डावाच्या आठव्या ओव्हरमध्ये इश सोढी गोलंदाजी करत होता.
यावेळी ईशान किशन (Ishan Kishan) फलंदाजी करत होता. ईशानने ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सूर्याच्या डोक्यावरून एक उंच शॉट मारला. हा शॉट इतका तगडा होता की, यामध्ये सूर्याला मोठी दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र तितक्यातच सूर्या खाली वाकला म्हणून ही थोडक्यासाठी सूर्या बचावला.
टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला होता. भारताकडून सलामीस इशान किशन आणि ऋषभ पंत आले होते. मात्र पंत मोठी खेळी करू शकल नाही 6 धावांवर स्वस्तात परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि किशनने भागीदारी केली. इशान किशन 36 धावांवर बाद झाला, मात्र त्यानंतर भारताच्या विकेट्स पडत गेल्या.
न्यूझीलंड संघाचाही सुरूवात खराब झाली, पहिल्याच षटकामध्ये भुवनेश्वर कुमारने फिन अॅलेनला शून्यावर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर कॉनवेला वॉशिंग्टनने 25 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. एकीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने मैदानावर तग धरून राहिला होता. 52 चेंडूत केनने 61 धावांची खेळी केली मात्र सिराजने त्याला फुलटॉस बॉलवर बाद केलं.
केन गेल्यावर न्यूझीलंडच्या विकेट्स पडत गेल्या आणि 126 धावांवर पूर्ण संघ ऑल आऊट झाला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.