Shaheen Afridi ला झालंय काय? म्हणतोय "दुआ में याद रखना"

Shaheen Afridi Injury Update: हॅरी ब्रूकचा कॅच घेताना शाहिन अफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्याला ओव्हर देखील पुर्ण करता आली नाही. 

Updated: Nov 20, 2022, 08:21 PM IST
Shaheen Afridi ला झालंय काय? म्हणतोय "दुआ में याद रखना" title=
Shaheen Afridi

Shaheen Shah Afridi undergoes for surgery : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. जिंकत आलेला सामना पाकिस्तानच्या हातून निसटला तो 16 व्या षटकात. त्याला कारण होतं, पाकिस्तानचा स्टार बॉलर शाहिन शाह अफ्रिदीला (Shaheen Afridi Injury) झालेली दुखापत. (Shaheen Afridi Injury Update Pakistan pacer gives big update)

हॅरी ब्रूकचा कॅच घेताना शाहिन अफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्याला ओव्हर देखील पुर्ण करता आली नाही. त्यानंतर बेबी ओव्हरमध्ये इंग्लंडने संधी साधली आणि सामना फिरवला होता. मात्र, शाहिन आफ्रिदीला पुन्हा ओव्हर टाकता आली नाही. अशातच आता वर्ल्ड कपनंतर शाहिन पुन्हा दिसलाय तो हॉस्पिटलच्या बेडवर...

आणखी वाचा - Suryakumar Yadav: एकटा सुर्या न्यूझीलंडवर भारी! T20 मध्ये केली रोहितच्या 'या' खास रेकॉर्डची बरोबरी

नुकतीच शाहिन शाह अफ्रिदीवर शस्त्रक्रिया (Shaheen Shah Afridi undergoes surgery) झाल्याची माहिती मिळाली आहे. तो सध्या क्रिकेटपासून दूर हॉस्पिटलच्या बेडवर पडून राहिलाय. सोशल मीडियावर देखील तो अॅक्टिव असतो. त्याने ट्विटवर फोटो शेअर करत आरोग्याविषयी माहिती दिली आहे.

पाहा ट्विट - 

काय म्हणाला Shaheen Afridi?

माझी अॅपेन्डेक्टॉमी सर्जरी (Appendectomy) झाली. अल्लाहच्या कृपेने मी आता बरा आहे. दुवा मैं याद रखना, असं ट्विट शाहिने केलंय. त्यावेळी त्याने त्याचा फोटो देखील शेअर केलाय. त्यात तो बेडवर आराम करताना दिसतोय. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. त्याचबरोबर तो पुन्हा मैदानात यावा, यासाठी अनेकजण प्रार्थना देखील करत आहेत.