Syed Mushtaq Ali Trophy 2024 : बडोदा क्रिकेट संघाने सध्या देशांतर्गत सुरु असलेल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy 2024) इतिहास रचला आहे. गुरुवारी इंदोरमध्ये सिक्कीम विरुद्ध (Baroda vs Sikkim) खेळलेल्या टी 20 सामन्यात फक्त 5 विकेट्स गमावून बडोदा संघाने 349 धावा करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 20 ओव्हरमध्ये 349 धावा हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर आहे. यापूर्वी जगात कोणत्याही संघाने टी20 मध्ये एवढ्या धावा केल्या नव्हत्या. यापूर्वी टी 20 मध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड हा झिम्बाब्वेकडे होता. त्यांनी याचवर्षी गांबियाच्या विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 344 धावा केल्या होत्या.
बडोदा क्रिकेट संघाने 349 धावा केल्या यात सर्वात मोठा वाटा हा विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या भानू पनिया याचा होता. तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी आलेल्या भानूने 262.75 स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने फक्त 51 बॉलमध्ये 134 धावा केल्या. त्याने दरम्यान 15 षटकार आणि 5 चौकार लगावले. याशिवाय सलामी फलंदाज शाश्वत रावतने 43 धावा तर अभिमन्यू सिंह राजपूत याने 53 धावा करून संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. कृणाल पंड्याच्या नेतृत्वात बडोदा संघ खेळत आहे. फलंदाज शिवालिक शर्माने 55 धावा, व्ही सोलंकीने 50 धावा केल्या. बडोदाने फलंदाजीच्या इनिंगमध्ये सिक्कीम विरुद्ध 37 षटकार लगावले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये यापूर्वीची सर्वोच्च सांघिक धावसंख्या पंजाबने केली होती.
हेही वाचा : फक्त विनोद कांबळीच नाही तर व्यसनामुळे 'या' 4 क्रिकेटर्सचंही करिअर उध्वस्त झालंय
HISTORY CREATED IN SMAT. Baroda smashed record 349/5 in 20 overs in SMAT, the highest ever score in the history of T20 cricket. pic.twitter.com/ptS4j3t8vO
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) December 5, 2024
बडोदा 349/5 विरुद्ध सिक्किम - 2024
झिम्बाब्वे 344/4 विरुद्ध गाम्बिया - 2024
नेपाल 314/3 विरुद्ध मंगोलिया - 2023
भारत 297/6 विरुद्ध बांग्लादेश - 2024
बडोदाचा फलंदाज विष्णू सोलंकीनेही 16 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. त्याने 6 षटकार आणि 2 चौकार ठोकले. बडोद्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५ फलंदाजांच्या मदतीने बडोद्याने विश्वविक्रम केला. बडोदाने हा सामना कृणाल पंड्याच्या नेतृत्वात खेळला. कारण हार्दिक पांड्या या सामन्याचा भाग नव्हता.