मुंबई: क्रिकेटचा सामना सुरू असताना मैदानात क्रिकेटपटूसोबत एक अपघात झाला. या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुदैवान या अपघातात क्रिकेटपटूला दुखापत झाली मात्र मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान एका क्रिकेटपटूचा अपघात झाला. 23 मार्च रोजी पर्थमधील डब्ल्यूएसीए मैदानावर मार्श वन-डे कप 2021 रोजी या स्पर्धा झाल्या. पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया यांच्यात हा सामना झाला. या सामन्यादरम्यान ही दुर्घटना घडली.
Ouch! Hopefully Mac Harvey is ok after this heavy collision with the WACA fence #MarshCup pic.twitter.com/QeSb5PxbPO
— cricket.com.au (@cricketcomau) March 23, 2021
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत होता. त्यावेळी फलंदाज जोश इंग्लिसने जोरदार चौकार मारला. त्याने टोलवलेला बॉल रोखण्यासाठी फील्डर धावला आणि बाउंड्रीवर जोरात आदळला. या दुर्घटनेमुळे खेळाडूला मोठी दुखापत झाली आहे.
हा अपघात ग्राऊंड स्टाफच्या चुकीमुळे झाल्याचा आरोप केला जात आहे. याचं कारण म्हणजे बाऊंड्रीच्या किनाऱ्यावर फोमने कव्हर न केल्यानं खेळाडूला गंभीर दुखापत झाली. याचा फटका क्रिकेटपटूला मोठा बसला असल्यानं ग्राऊंड स्टाफवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.