IPL 2021 Anthem वर विराट कोहली आणि रोहित शर्मानं धरला ठेका, पाहा व्हिडीओ

9 एप्रिल ते 30 मे पर्यंत सहा शहरांमध्ये IPLचे सामने खेळवले जाणार आहेत. 

Updated: Mar 24, 2021, 11:20 AM IST
IPL 2021 Anthem वर विराट कोहली आणि रोहित शर्मानं धरला ठेका, पाहा व्हिडीओ title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज संपल्यानंतर आता IPLची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत सहा शहरांमध्ये IPLचे सामने खेळवले जाणार आहेत. त्याआधी IPLचं गीत मंगळवारी रीलिज करण्यात आलं. या IPL 2021 Anthemमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा डान्स करताना दिसत आहे. 

IPLनं आपल्या ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केला असून सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हे गीत क्रिकेटप्रेमींना जरी आवडलं नसलं तरी विराट आणि रोहितच्या डान्समुळे सध्या हे गीत चर्चेचा विषय ठरलं आहे. 

यंदा IPL 2021 14 व्या हंगामातील पहिला सामना 9 एप्रिल रोजी पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये रंगणार आहे. या IPL 2021 Anthem मधून साहस आणि आत्मविश्वासाच्या भावनेला सॅल्युट केला आहे. या गीतावर अनेक प्रतिक्रिया देखील येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या गीतामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा डान्स करताना दिसतो आहे. त्यामुळे हा व्हिडीओ अधिक व्हायरल होत आहे. सर्वांसाठी त्या दोघांनी केलेला डान्सच जास्त चर्चेचा विषय बनला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.