पर्थ : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये (AUS vs ENG 1st T20) तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रडीचा डाव?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील (AUS vs ENG 1st T20) पहिल्या टी-20 सामन्यात एक मोठी घटना घडली. या घटनेची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पहिल्या T20 सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू वेडने (matthew wade) इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूडला (mark wood) बाद होऊ नये म्हणून धक्काबुक्की केली. ही संपूर्ण घटना व्हिडिओत कैद झाली आहे.
घटना काय?
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 17व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ही घटना घडली. मॅथ्यू वेडने (matthew wade) मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण बॉल हवेत गेला. अशा स्थितीत मार्क वुडला (mark wood) हा बॉल कॅच करण्याची संधी होती. मात्र मार्क वुडला कॅच जवळ येताना पाहून वेडने क्रीजच्या आत जाण्याच्या नावाखाली लाजिरवाण कृत्य केलं. वेडने कॅच ड्रॉपसाठी मार्क वुडला हाताने ढकलले, त्यामुळे वुडला कॅच घेता आलाचं नाही. या घटनेने मैदानात वादही निर्माण झाला होता.
इंग्लंड संघाने अपील केले नाही
या प्रकरणात इंग्लंड संघाने वेडविरुद्ध 'ऑब्सट्रक्टिंग द फील्ड' (अडथळा आणल्याबद्दल) अपील देखील केली नाही, त्यामुळे मैदानावरील अंपायर्सने हे प्रकरण थर्ड अंपायरकडे पाठवली नाही. जर इंग्लंड संघाने या विरूद्ध अपील केली असती, तर वेडला (matthew wade) थर्ड अंपायरने नकार दिला असता. कारण त्याने वुडला जाणीवपूर्वक धक्का दिला होता.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) October 9, 2022
दरम्यान या कॅच ड्रॉपचा फायदा मॅथ्यू वेडने (matthew wade) घेतला नाही, आणि 15 चेंडूत 21 धावा केल्यानंतर तो आऊट झाला. तो शेवटचा बॅटसमन होता जो सामना जिंकवू शकला असता, मात्र तो बाद झाल्यानंतर इंग्लंडने सामना जिंकला.या विजयासह इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.