Asia Cup : टीम इंडियाच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, फायनलमध्ये भारताविरूद्ध खेळणार 'हा' देश

POINTS TABLE: भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये ( Points Table ) मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 13, 2023, 07:18 AM IST
Asia Cup : टीम इंडियाच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, फायनलमध्ये भारताविरूद्ध खेळणार 'हा' देश title=

POINTS TABLE: एशिया कप 2023 ( Asia Cup 2023 ) मध्ये टीम इंडियाची ( Team India ) गाडी सुसाट सुरु असल्याचं दिसून येतंय. पाकिस्ताननंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा देखील दारूण पराभव केला. श्रीलंकेला नमवल्यानंतर टीम इंडियाने ( Team India ) जवळपास फायनलचं तिकिटं गाठलं आहे. दरम्यान भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये ( Points Table ) मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. टीम इंडिया विरूद्ध फायनलमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध ( India vs Sri Lanka ) 41 रन्सने विजय मिळवला. एशिया कपच्या सुपर 4 स्पर्धेतील चौथा सामना जिंकून टीम इंडियाने अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलंय आहे. तर दुसरीकडे भारताविरूद्ध झालेल्या या पराभवानंतर श्रीलंकेसमोरच्या अडचणींमध्ये वाढ झालीये. 

टीम इंडियाचं फायनलमधील स्थान जवळपास निश्चित

एशिया कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिलीये. टीम इंडियाने पहिल्या ग्रुप मॅचमध्ये नेपाळचा 10 विकेट्सने पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 228 रन्सने पराभव करून टीम इंडिया पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानी झेप घेतली. तर आता श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचे दोन सामन्यांत 4 पॉईंट्स झाले असून टीमने अंतिम फेरीत प्रवेश केलाय. टीम इंडियाला अजून बांगलादेशसोबत 15 सप्टेंबरला कोलंबोमध्ये दुसरा सामना खेळायचा आहे.

श्रीलंकेच्या टीमसमोर फायनल गाठण्यासाठी मोठी अडचण

भारताविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर श्रीलंकेच्या ( India vs Sri Lanka ) टीमला आता अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तान टीमला शेवटच्या सामन्यात पराभूत करावं लागणार आहे. श्रीलंकेच्या टीमने पाकिस्तानला पराभूत केल्यास त्यांना भारतासोबत अंतिम सामना खेळता येणार आहे. 

दुसरीकडे श्रीलंका पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यास एशिया कपतून बाहेर पडेल. जर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर श्रीलंका अंतिम फेरीत पोहोचणार आहे. मात्र श्रीलंकेचं रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगलं आहे.

पाकिस्तानसाठी पुढचा सामना करो या मरो

भारताविरुद्धच्या 228 रन्सच्या पराभवानंतर पाकिस्तान टीमच्या अडचणी वाढताना दिसतायत. पाकला फायनलमध्ये जायचं असेल तर श्रीलंकेविरुद्ध ( Pakistan vs Sri Lanka ) विजय मिळवावा लागणार आहे. जर हा सामना पावसामुळे सामना रद्द झाला तर एशिया कपमध्ये पाकिस्तान टीमचा प्रवास इथेच संपणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना 14 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या मैदानावर होणार आहे.