Asia Cup : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचं 1966 व्या वर्षाशी खास कनेक्शन, जाणून घ्या

1966 व वर्ष आणि विराटच्या 71 व्या शतकाचा संबंध काय? 'त्या' व्हायरल फोटोत लपलंय तरी काय रहस्य, हा फोटो पाहून तुम्हीच सांगा 

Updated: Sep 10, 2022, 02:53 PM IST
Asia Cup : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचं 1966 व्या वर्षाशी खास कनेक्शन, जाणून घ्या  title=

दुबई : आशिया कप (Asia cup 2022) टीम इंडियाच्या हातातून निसटला. मात्र शेवटचा सामना टीम इंडियाच्या  (Team India) विजयाने आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकाने गोड झाला. या स्पर्धेतील विशेष बाब म्हणजे टीम इंडियाने आशिया कप गमावला असला तरी विराट कोहली फॉर्ममध्ये परतलाय. त्यामुळे अनेक क्रिकेट फॅन्सना आशिया कप गमावण्यापेक्षा विराट फॉर्ममध्ये परतण्याचा जास्त आनंद आहे. 

आशिया कपमधील (Asia cup 2022)  अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) फॉर्ममध्ये परतला होता. त्याने नाबाद 122 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 12 फोर आणि 6 सिक्स ठोकले.  ही स्फोटक खेळी करून त्याने कारकिर्दीतील 71वे शतक ठोकलं होतं. दरम्यान यावेळी तो सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला. 

विराटचा (Virat Kohli) शतक ठोकतानाच तो सुवर्णक्षण व सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विराटच्या 71व्या शतकानंतर सर्वंत्र त्याचीच चर्चा सुरु होती. अनेक फॅन्सनी त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तसेच मैदानातील त्याचा सेलिब्रेशनचा फोटो देखील समोर आले होते. त्यात आता विराटचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोच कनेक्शन 1966 वर्षाशी जोडले जातेय. जाणून घ्या कसे ते. 

1966 वर्षाशी कनेक्शन काय?
विराटच्या 71व्या शतकानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोत एक फोटो खुपच छान आहे. या फोटोत विराटचा शतक ठोकण्याचा तो क्षण टीपण्यात आलाय. मात्र फोटोत विराट बॅट उंचावताना ब्लर दिसत असून स्टेडीअममध्ये उभं राहून एक व्यक्ती त्याला टीम इंडियाची जर्सीत चिअर करताना दिसत आहे. त्यामुळे हा व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर काहींना ही व्यक्ती परिचीतही असेल. 

विराटला स्टेडीअममध्ये उभं राहून चिअर करताना दिसणारी व्यक्ती ही भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी आहेत. विराटच्या या शतकानंतर बिशनसिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांनी देखील त्याचं अभिनंदन केलं. बिशनसिंग बेदी यांनी 1966 ते 1979 मध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होत. त्यामुळे 1966 व्या वर्षात क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बिशनसिंग बेदीचं कनेक्शन विराटच्या 71 व्या शतकाशी जोडले जात आहे. 

दरम्यान बिशनसिंग बेदी (Bishan Singh Bedi) अनेकदा विराट कोहलीला (Virat Kohli) सल्ला देताना दिसले आहेत. या संबंधित बातम्या ही प्रसिद्द झाल्या होत्या.बिशनसिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांनी विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधील भारताच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा सल्ला दिला होता. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी विराटला हा सल्ला दिला होता. विराटने हा सल्ला पुढे मानला असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.