Sport News : भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला होता. याचा टीम इंडियाला मोठा फटका बसलेला पाहायला मिळाला. आशिया कपमधील पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये जडेजाने बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही कमाल केली होती. त्यानंतर हॉंगकॉंगच्या सामन्यामध्येही जडेजाने 15 धावा देत 1 विकेट घेतली होती. मात्र अचानक जडेजा दुखापतग्रस्त झाला होता, यामुळे पुर्ण स्पर्धेला मुकला होता मात्र अशातच जडेजाच्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जडेज्याच्या दुखापतीमागचं वेगळंच कारण समोर आलं आहे. जडेजाला मैदानावर दुखापत झाली नाही तर मैदानाबाहेर झाली होती. त्याच्या दुखापतीचं मुख्य कारण अडवेंचर अक्टिविटी होतं. या अॅक्टिविटीमध्ये स्की-बोर्डवर जडेजाला बॅलन्स करायचा होता. विशेष म्हणजे हा कोणत्याही ऑफिशिअल ट्रेनिंगचा भाग नव्हता. मात्र ही अॅक्टिविटी असताना जडेजाचा बॅलन्स बिघडला आणि त्याला दुखापत झाली. आशिया कप फायनलच्या तोंडावर जडेजासोबत संघाला ही ट्रेनिंग महागात पडली आहे.
जडेजा अडवेंचर अक्टिविटी करताना घसरला आणि खाली पडला. याच वेळी त्याचा गुडघा मुडपला होता. आता ही दुखापत गंभीर झाली असून जडेजाने यावर शस्त्रक्रिया देखील केली आहे. बीसीसीआय लवकरच याची चौकशी करणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, जडेज्याच्या दुखापतीनंतर क्रिकेट वर्तुळात जडेजासोबत कट रचला गेल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. जडेजा आता दुखापतीमुळे येत्या टी-20 विश्वचषकालाही मुकणार आहे. मात्र जडेजाचा फॉर्म पाहता संघातील प्रमुख खेळाडू होता. आता जडेजाची जागा भरून काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच चौकशी झाली तर काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे.