बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, ऑलराऊंडर खेळाडू बाहेर

Team India News: येत्या 17 सप्टेंबरला एशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सुपर-4 मधले दोन सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारलीय. आता सुपर-4 मधील टीम इंडियाचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 14, 2023, 09:16 PM IST
बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, ऑलराऊंडर खेळाडू बाहेर title=

ND vs BAN, Asia Cup 2023 News: एशिया कप 2023 स्पर्धेत सुपर-4 मधील शेवटचा सामना 15 सप्टेंबरला भारत आणि बांलादेशदरम्यान (India vs Bangladesh) रंगणार आहे. सलग दोन पराभवांमुळे बांगलादेशचा संघ स्पर्धेतून याआधीच बाद झाल आहे. तर सलग दोन सामने जिंकत टीम इंडियाने (Team India) अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी केवळ औपचारीकता असेल. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) काही खेळाडूंना बाहेर बसावे लागू शकतं तर काही खेळाडूना संघात संधी मिळू शकते. 

सलामीची जोडी
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही हिट जोडीच सलामीला उतरेल. गेल्या दोन सामन्यात या जोडीने टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्य सामन्यात या जोडीने शतकी भागिदारी करत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं होतं. 

मधली फळीतील फलंदाज
मधल्या फळीत तीसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीची जागा पक्की आहे. तर चौथ्या क्रमांकावर विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल फलंदाजीला येईल. श्रेयस अय्यर दुखापगस्त असल्याने पाचव्या क्रमांकावर ईशान किशनची जागा निश्चित आहे. सूर्यकुमार यादवला या सामन्यातही प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

ऑलराऊंड खेळाडू
टीम इंडियाच उपकर्णधार हार्दिक पांड्या ऑलराऊंडर म्हणून सहाव्या क्रमांकवर तर रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. 

भारताची गोलंदाजी
एशिया कप स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या कुलदीप यादवला संघाबाहेर ठेवण्याची चूक रोहित शर्मा करणार नाही. त्याऐवजी ऑलराऊंडर अक्षर पटेलला बाहेर बसावं लागेल.  तर  शार्दुल ठाकूरलाही प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी संघात जसप्रीत बुमरहा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान त्रिकुटावर गोलंदाजीची मदार असेल. 

एशिया कपमधला रेकॉर्ड
एशिया कपमध्ये टीम इंडियाचा जबरदस्त रेकॉर्ड आहे. टीम इंडियाने तब्बल अकरावेळा एशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यातल्या सातवेळा टीम इंडियाने जेतेपद पटकावलं आहे. आता आठव्यांदा एशिया कप जिंकण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. येत्या 17 सप्टेंबरला एशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 

 

ग्लादेश भारताची संभाव्य Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज