Rohit Sharma: तीन विकेट्स गेल्यावर मी घाबरून...; वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर काय म्हणाला रोहित?

Rohit Sharma: टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली तेव्हा विजय हाती लागणं कठीण असल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत करावी लागली असली तरी भारताने वर्ल्डकपची सुरुवात मात्र विजयाने केली. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 9, 2023, 06:46 AM IST
Rohit Sharma: तीन विकेट्स गेल्यावर मी घाबरून...; वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर काय म्हणाला रोहित? title=

Rohit Sharma: वर्ल्डकप 2023 ला सुरुवात झाली असून टीम इंडियाने ( Team India ) या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. विराट कोहली ( Virat Kohli ) आणि के.एल राहुल यांच्या उत्तम खेळीने टीम इंडियाला विजय मिळाला. दरम्यान या पहिल्याच सामन्यात मिळालेल्या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) खूश असल्याचं दिसून आलं. 

विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान

टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली तेव्हा विजय हाती लागणं कठीण असल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत करावी लागली असली तरी भारताने वर्ल्डकपची सुरुवात मात्र विजयाने केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) खूप आनंदी दिसला. दरम्यान या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, जेव्हा पहिल्या 3 विकेट्स आम्ही गमावल्या तेव्हा मी हताश झालो होतो. 

पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, "वर्ल्डकपची सुरुवात अशा प्रकारे सुरू होणं खूप छान आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने फिल्डींग केली. आम्ही खूप मेहनत घेत आहोत. मुळात खेळाडूंनी परिस्थितीचा चांगलाच फायदा घेतला. मात्र जेव्हा आम्ही पहिल्या तीन विकेट गमावल्या तेव्हा मी हताश झालो होतो. फलंदाजी करताना आम्ही काही खराब शॉट खेळले." 

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला, याचं श्रेय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना द्यायला पाहिजे. विकेट्स गेल्यानंतर राहुल आणि कोहलीने अप्रतिम खेळ दाखवला. पुढे जाऊन आम्हाला विविध पीचवर वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे चेन्नईचे चाहते कधीही निराश करत नाहीत. आज त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

रोहित शर्मा शून्यावर बाद

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर आऊट झाला. मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीसमोर त्याला खातंही उघडता आलं नाही. आऊट झाल्यावर रोहित खूप निराश दिसत झाला. दरम्यान 11 ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्या सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा चांगली कामगिरी करेल अशी, चाहत्यांची अपेक्षा आहे.