अफगाणिस्तानचा धमाका, टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजला पछाडत मोठी झेप

अफगाणिस्तानने झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये (AFG vs ZIM) 60 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 

Updated: Jun 5, 2022, 03:27 PM IST
अफगाणिस्तानचा धमाका, टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजला पछाडत मोठी झेप title=

AFG vs ZIM 1st Odi : अफगाणिस्तानने झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये (AFG vs ZIM) 60 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह अफगाणिस्तानने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानने यासह वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट्सटेबलमध्ये मोठी उडी घेतली. (afg vs zim 1st odi afghanistan beat zimbabwe by 60 runs surpassed to west indies and india and come to 3rd rank  in icc world cup super league 2022)   

टीम इंडिया आणि विंडिजला पछाडलं

अफगाणिस्तान वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट्स टेबलमध्ये (Cricket World Cup Super League) तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. अफगाणिस्तानने 10 सामन्यातून 8 मॅचममध्ये विजय मिळवला. यासह अफगाणिस्तानच्या नावे 80 पॉइंट्स आहेत. अफगाणिस्तानने या कामगिरीमुळे टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडिजला मागे सोडलंय.

टीम इंडियाचे 79 आणि विडिंजचे 80 पॉइंट्स आहेत. तर बांगलादेश अव्वल स्थानी आहे. बांगलादेशने 18 मधून 12 सामन्यात विजय  मिळवलाय. तसेच दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडने 15 मधून 9 सामने जिंकले आहेत.

अफगाणिस्तान विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात 2014 पासून 5 वनडे सीरिज खेळवण्यात आल्या. अफगाणिस्तानने या पाचही मालिका जिंकल्यात. पाहुण्या अफगाणिस्तानने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये पुन्हा एकदा आपली जादू दाखवली.

उभयसंघातील दुसरा एकदिवसीय सामना हा सोमवारी 7 जूनला खेळवण्यात येणार आहे. झिंबाब्वेसमोर हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसरी मॅच जिंकून मालिका खिशात घालण्याचा मानस अफगाणिस्तानचा असेल.