टीम इंडियाचे दुसऱ्या कसोटीत असे झालेत ७ रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये सात अनोखे विक्रम झालेत. दरम्यान, आफ्रिकेत भारताने पराभवाची मालिका कायम ठेवलेय. सलग दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाने २-०ने ही मालिकाही गमावलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2018, 08:44 PM IST
टीम इंडियाचे दुसऱ्या कसोटीत असे झालेत ७ रेकॉर्ड title=
फोटो : रॉयटर्स

सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये सात अनोखे विक्रम झालेत. दरम्यान, आफ्रिकेत भारताने पराभवाची मालिका कायम ठेवलेय. सलग दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाने २-०ने ही मालिकाही गमावलेय.

टीम इंडियाने गतवर्षी कसोटीमध्ये अनेकांना पाणी पाजले होते. तसेच आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केलेत. मात्र, वर्षाच्या सुरुवातीला आफ्रिकेत दणकून मार खाल्लाय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताने ३ सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. केप टाऊन कसोटीपाठोपाठ सेंच्युरिअन कसोटीमध्येही टीम इंडियाला मोठा पराभव पत्करावा लागलाय.

कसोटीत झालेल्या रेकॉर्डची अशी नोंद

– वन-डेत दुहेरी शतक ठोकणाऱ्या रोहित शर्मा याची कसोटीत चौथ्या डावात ४७ ही रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितची ही सर्वोच्च धावसंख्या होय.
– एका कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये धावबाद होणारा चेतेश्वर पुजारा पहिला भारतीय फलंदाज. 

– टीम इंडियाचा कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीने गमावलेली ही पहिली मालिका ठरली.

- १९८४ नंतर भारताने पहिल्यांदाज १०० धावांच्या आत ७ गडी गमावले. केप टाऊन कसोटीत भारताची धावसंख्या ७ बाद ९७  तर दुसऱ्या डावात ७ बाद ८२ अशी होती. सेंच्युरिअन कसोटीतही याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. टीम इंडियाला टार्गेटचा पाठलाग करताना दमछाक झाली. ७ बाद ८७ धावसंख्या राहिली.

– दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू लुंगी निगडी हा टीम इंडियाविरुद्ध खेळताना पदार्पणात सामनावीराचा किताब पटकावणारा पाचवा खेळाडू ठरला.

– १९९२ पासून ७ पैकी भारताने गमावलेला हा सहावा कसोटी सामना ठरला. २०१०-११ मध्ये टीम इंडियाचा आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी सामना झाला. तो अनिर्णित राखण्यात यश मिळवले.