मुंबई क्रिकेट असोशिएशनमध्ये सुमार कामगिरीवरून ब्लेम गेम

रणजी स्पर्धेतील मुंबई संघाच्या खराब कामगिरीनंतर आता ब्लेमगेम सुरू झालाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत सिलेक्टर्स-कोच विरूद्ध कार्यकारिणी सदस्य असा जोरदार वाद झाला.

Updated: Jan 17, 2018, 07:39 PM IST
मुंबई क्रिकेट असोशिएशनमध्ये सुमार कामगिरीवरून ब्लेम गेम title=

मुंबई : रणजी स्पर्धेतील मुंबई संघाच्या खराब कामगिरीनंतर आता ब्लेमगेम सुरू झालाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत सिलेक्टर्स-कोच विरूद्ध कार्यकारिणी सदस्य असा जोरदार वाद झाला.

रणजी स्पर्धेतील खराब कामगिरीचं खापर माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे, विद्यमान प्रशिक्षक समीर दिघे आणि सिलेक्टर्सवर फोडण्यात आलं. अनेक सिलेक्टर्सच्या खासगी कोचिंग अकॅडमी आहेत. या अकॅडमीतल्या खेळाडूंनाच संघात स्थान मिळतं. त्यामुळं खरी गुणवत्ता संघाबाहेरच राहते, असा घणाघाती आरोप कार्यकारिणीतल्या काही सदस्यांनी केला. यामुळं मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत... 

मुंबई रणजी संघ नुकताच 500 वी मॅच खेळला. यानिमित्तानं वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीए ग्राऊंडवर दिमाखदार सोहळा पार पडला. मात्र यंदाच्या मोसमात रणजी स्पर्धेत मुंबई संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाला. कर्नाटकनं मुंबईचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर सिलेक्टर्स अजित आगरकर, निलेश कुलकर्णी, जतीन परांजपे, सुनील मोरे, अमोल मुझुमदार, बॉलिंग कोच रमेश पोवार आणि ओमकार साळवी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय.