Shani Dev Idol: नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव ज्यांच्या राशीत येतात त्यांचा ते न्याय निवाडा करतात असं बोललं जातं. शनि साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशा यामुळे जातक अक्षरश: मेटाकुटीला येतात. त्यामुळे शनिवारी उपाय करून प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. शनिवारी शनिदेवांची पूजा केली जाते. देशभरात शनिदेवांची अनेक मंदिरं आहे. शनि शिंगणापूर येथील शनि मंदिर प्रसिद्ध आहे. पण शनिदेवांची प्रतिमा घरी ठेवून कधीच पूजा केली जात नाही. चला जाणून घेऊया यामागचं कारण...
शनिदेवांची मूर्ती घरी न ठेवण्यामागे पौराणिक कारणही आहे. मान्यतेनुसार शनिदेवांना त्यांच्या पत्नीनं श्राप दिल्याने असं झालं आहे. एकदा शनिदेवांच्या पत्नीने धान्यात असणाऱ्या शनिदेवांना जागवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्यांचं ध्यान काही सुटलं नाही. त्यामुळे क्रोधित झालेल्या पत्नीने त्यांना श्राप दिला. जे लोक शनिदेवांना पाहतील त्यांच्या जीवनात संकट येतील, असा श्राप आहे.
शनिदेवांची मूर्ती घरात ठेवल्याने त्यांची दृष्टी आपल्यावर पडते. धार्मिक मान्यतेनुसार शनिची दृष्टी अशुभ मानली जाते. यासाठी शनिदेवांची मूर्ती घरात ठेवणं चांगलं मानलं जात नाही.
बातमी वाचा- Havan Upay: हवनमधील राख असते प्रभावशाली, 'या' उपयांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल!
शनिदेवांकडे डोळ्यात पाहणं अशुभ मानलं जातं. शनिदेवांच्या नजरेस नजर मिळवल्यास संकट ओढावू शकतं. शनिदेवांची पूजा करताना त्यांच्या डोळ्यात पाहून नका. नजर चूकवत आराधना केल्यास शनिच्या प्रकोपापासून सुटका मिळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)