Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा कोणत्या देवाचा सण असून त्याला अक्षय्य तृतीया असं नाव का पडलं? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा 

नेहा चौधरी | Updated: May 7, 2024, 02:49 PM IST
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं? title=
Which God is worshiped on Akshaya Tritiya and why How did Akshaya Tritiya get its name in marathi

Akshaya Tritiya 2024 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया असं म्हणतात. साडे शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त मानला जातो. यादिवशी श्राद्ध दिवस म्हणजे पितरांचा सण आहे. हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला महत्त्व आहे. प्रत्येक तिथी आणि वार हे कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित करण्यात आलंय. तिथी आणि वारानुसार देवाची पूजा केल्यास तुम्हाला पूजेचा शुभ लाभ मिळतो. (Which God is worshiped on Akshaya Tritiya and why How did Akshaya Tritiya get its name in marathi)

अक्षय्य तृतीया तिथी!

पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी शुक्रवार 10 मे 2024 पहाटे 4.17 वाजेपासून शनिवारी 11 मे 2024 पहाटे 02:50 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार शुक्रवार 10 मे 2024 अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. 

अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा करतात?

अक्षय्य तृतीयेला आखा तीज असंही म्हटलं जातं. यादिवशी शुभ कार्य करण्यासाठी पंचांगात मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हिंदू पौराणिक कथेनुसार त्रेतायुगाची सुरूवात अक्षय्य तृतीयेला झाली आहे. अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती, भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराची जयंती ही एकाच दिवशी येते. म्हणून साधारपणे यादिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. 

हेसुद्धा वाचा - Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं का खरेदी करतात? सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त, तिथी काय?

अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?

या दिवशी जम, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होतं म्हणून या दिवसाला अक्षय्य तृतीया असं नाव पडलं. 

अक्षय्य तृतीया नावामागील आख्यायिका

श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता. पांडव कोणत्याही अडचणीत, संकटात सापडले की श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा. एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले होते. श्रीकृष्णही त्यावेळी तिथे उपस्थितीत होते. पांडव आपला रथ दूर अंतरावर सोडून गंगेच्या काठी आले होते. तिथे असलेल्या सुंदर मंदिरात बसले होते. धर्मराज धार्मिक असून तो खूप मोठ्या प्रमाणात दानधर्म करतो. म्हणून धर्माला प्रश्न पडला की, माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल? त्यांनी उत्तरासाठी श्रीकृष्णाकडे पाहिलं. 

हेसुद्धा वाचा - Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयाला सोनं - चांदी खरेदी करणं शक्य नाही, तर 'या' 6 गोष्टी खरेदी करुन वाढवा समृद्धी

श्रीकृष्ण म्हणाला की, वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावं, या दिवशी होमहवन करावं, यज्ञात आहुती द्याव्यात, देवाच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरिता, वाडवडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म तर्पण, दानधर्म करावं. अक्षय्य तृतीयेला केलेले कर्म कायम टिकतं. सदैव अक्षय्य राहतं. वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया असं नाव पडलं. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)