तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट

Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते.   

नेहा चौधरी | Updated: May 28, 2024, 04:17 PM IST
तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट  title=
Do you also consider Shivlinga and Jyotirlinga to be the same Know the difference between the two list of 12 Jyotirlingas

Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू देवदेवतांची पूजेला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार आठवड्यातील वार हे देवदेवतांच्या पूजेसाठी देण्यात आलाय. आज सोमवार म्हणजे हिंदू धर्मानुसार भगवान महादेवाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशात आज महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात पूजेसाठी भक्त गर्दी करतात. सध्या चार धाम यात्रा सुरु आहे. केदारनाथमध्ये भोलेनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. धार्मिक मान्यतांनुसार, शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. दुसरीकडे भक्त शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एकच मानतात, पण या दोघांमध्ये खूप फरक आहे, असं आनंदी वास्तू आणि ज्योतिषाचार्य आनंद पिंपळकर यांनी सांगितलीय. (Do you also consider Shivlinga and Jyotirlinga to be the same Know the difference between the two list of 12 Jyotirlingas)

शिवलिंग म्हणजे काय?

शिवपुराणानुसार शिवलिंगाचा अर्थ अनंत.. ज्याचा आरंभ किंवा अंत होत नाही. शिवलिंग हे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या शाश्वत स्वरूपाचं एकच रूप मानलं जातं. जेथे लिंग म्हणजे प्रतीक. म्हणजे भगवान शिवाचे प्रतीक शिवलिंग मानलं गेलं आहे. भगवान शिवाचे प्रतीक म्हणून, शिवलिंगाची निर्मिती मानवाने पूजा करण्यासाठी आणि जीवन पवित्र करण्यासाठी त्यासोबत घरामध्ये स्थापित करण्यासाठी केली आहे, असं पिंपळकर सांगतात. 

ज्योतिर्लिंग म्हणजे काय?

भारतात विविध ठिकाणी एकूण 12 ज्योतिर्लिंगे असून ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिव स्वतः प्रकाशाच्या रूपात त्या ठिकाणी जन्माला ते ठिकाण. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी भगवान शिव स्वयंभू म्हणून प्रकट झाले ती जागा. धर्मानुसार हे 12 ज्योतिर्लिंगे 12 राशींचे प्रतिनिधित्व करतात. धार्मिक मान्यतांनुसार जो व्यक्ती आपल्या आयुष्यात 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतो त्याला भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते, अशी मान्यता आहे. 

12 ज्योतिर्लिंगे कोणती आणि कोठे आहेत?

1. सोमनाथ ज्योतिर्लिंग – गुजरात

2. नागेश्वर ज्योतिर्लिंग – गुजरात

3. केदारनाथ ज्योतिर्लिंग – उत्तराखंड

4. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग – उत्तर प्रदेश

5. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – मध्य प्रदेश

6. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – महाराष्ट्र प्रदेश

7.ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – महाराष्ट्र प्रदेश

8 ज्योतिर्लिंग – महाराष्ट्र

9. भीमाशंकर ज्योतिर्लिंग – महाराष्ट्र

10. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग – झारखंड

11. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग – आंध्र प्रदेश

12. रामेश्वरम ज्योतिर्लिंग – तामिळनाडू

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)