Sun Saturn Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. कमी अधिक कालावधीमुळे कधी कधी एकाच राशीत दोनपेक्षा अधिक ग्रह येतात. नववर्ष 2023 मध्ये अशीच काहीशी युती पाहायला मिळणार आहे. सूर्य आणि शनिदेव एकाच राशीत एकत्र येणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सूर्याचे पुत्र आहेत. असं असलं तरी या दोघांचं एकमेकांशी पटत नाही. शनिदेव एकदा राशीत आले की भल्याभल्यांना घाम फोडतात. व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. तर ग्रहांचा राजा सूर्य मान, यश, आरोग्य आणि समृद्धी देणारा ग्रह आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकत्र येत असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये सूर्य आणि शनि कुंभ राशीत एकत्र येणार आहेत. यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होणार आहे. चला जाणून घेऊयात
ज्योतिष शास्त्रानुसार असा अद्भुत योग 30 वर्षांनंतर घडणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहेत. कुंभ राशीत पिता-पुत्र म्हणजेच सूर्य आणि शनि यांची युती होणार आहे. 17 जानेवारी 2023 रोजी शनी 30 वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, सूर्य 13 फेब्रुवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 14 मार्च 2023 पर्यंत या स्थितीत असतील. अशा प्रकारे 1 महिना कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्य एकत्र येतील. हा महिना काही लोकांसाठी खूप शुभ तर काहींसाठी कठीण जाणार आहे.
बातमी वाचा- Palmistry: तुमच्या हातावर शनि रेषा आहे का? असं बदलतं भाग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते
शनिन स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत होणारे संक्रमण सहा राशींसाठी फलदायी ठरेल. यात वृषभ, मिथुन, कन्या, मकर, धनु आणि कुंभ राशीच्या समावेश आहे. या राशीच्या लोकांना शनिदेव यश, संपत्ती आणि आनंद देतील. याशिवाय सूर्यदेवाच्या कृपेने जातकांना मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. युतीमुळे व्यक्तीमध्ये एक आकर्षण दिसून येईल आणि आत्मविश्वास वाढेल. कामात सहज यश मिळेल. न्यायालयात काही प्रकरणे असतील तर तीही निकाली निघतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)