राशीभविष्य १३ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता

काय म्हणतेय तुमची रास   

Updated: Jan 13, 2020, 07:42 AM IST
राशीभविष्य १३ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता title=

मेष- कामासोबतच जबाबदारीत देखील वाढ होईल. आजचा दिवस व्यस्त असेल. व्यवसायामध्ये काही बाबी विचारपूर्वक सोडवा. यशस्वी रहाल. ऑफिसमध्ये शांतता राहिल. प्रवासाचे योग आहे. 

वृषभ- जुन्या अडचणी संपतील. स्वत:वर लक्ष द्या. समाजातील आणि कुटुंबातील कामे पूर्ण होतील. अनेक विचार येतील. उत्पन्न आणि होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांकडून मदत मिळतील.  

मिथुन- धन लाभ होवू शकतो. अविवाहीत लोकांच्या विवाहाचे योग आहेत. मित्रांकडून आणि कुटुंबाकडून मदत मिळेल. काही प्रकरणात लोकांची मदत मिळणार नाही. आरोग्यात चढउतार पाहायला मिळतील. झोप मिळणार नाही. डोकेदुखी आणि डोळ्यात आग होण्याचा त्रास जाणवेल. 

करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्यांना इतरांची मदत मिळेल. काही चांगले आणि महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यापारामध्ये इतरांचा सल्ला मिळेल. धनलाब होण्यची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह - नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काहीजणांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. नोकरी बदलण्याच्या किंवा जास्त कमाई करण्याच्या मार्गांचा विचार करु शकता. यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही बाबतीत अचानक फायदा मिळेल. 

कन्या- वरिष्ठांचं सहकार्य तसं कमीच मिळेल. व्यवसायात सावध राहा. जी कामं हाती घ्याल त्यात यश मिळेलच असं नाही. व्यापाराच्या निर्णयांमध्ये कोणाचा सल्ला घ्या. एकटेपणापासून दूर राहा. साथीदारासोबत एखादा प्रवास घडू शकतो. जीवनसाथीसोबत वेळ घालवाल. 

तुळ- विचार केलेली कामे पूर्ण होवू शकतील. दिवस चांगला आहे. कुटुंबातील अनेक कामे तुम्हाला पार पाडावी लागतील. मित्रांसोबत वेळ व्यतीत कराल. गुंतवणुकीचा योग आहे. अचानक धन लाभ होवू शकतो. ऑफिस आणि व्यापारामध्ये अनेक फायदे होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक- मनात चांगले विचार येतील. विश्वासातील लोकांकडून सल्ला घ्या. त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. प्रतिभा सिद्ध करण्यात यशस्वी रहाल. नविन शिकण्यात रस राहील. स्वत:वर संयम ठेवा. विचार केलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

धनु- अडचणींमधून मुक्त व्हाल. नवीन तंत्रज्ञानामुळे तुमचे काम सुखकर हेईल. नवीन वस्तू विक्री करण्याचे योग आहेत. व्यवसायात कुटुंबाकडून मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. प्रेमात यश मिळेल.  

मकर- महत्त्वपूर्ण काम हाती घ्याल. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन व्यक्तींसोबत भेटी होतील. धैर्य ठेवा त्याचप्रमाणे प्रयत्न चालू ठेवा. धनलाभ हेण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळेल.  

कुंभ- मेहनतीचे फळ चांगले असेल, विचार केलेली कामे लवकर पूर्ण होतील. येणाऱ्या चांगल्या दिवसांसाठी बेत आखू शकाल. खास व्यक्तीसह मनातल्या गोष्टी शेअर कराल.  

मीन- आज केलेल्या कामांमुळे काहीतरी फायदा होईल. अचानक धन लाभ होईल. मनात पैशांसंबंधी अनेक प्रश्न उभे राहतील. या प्रश्नांवर ठाम निर्णय घेवू शकता. फिरायला बाहेर जाल. दिवस चांगला आहे.