Somvati Amavasya 2024 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो. आज जन्माष्टमीला श्रावण सोमवार आलाय. त्यामुळे दुहेरी व्रताने भक्त आनंदी आहेत. आज (26 ऑगस्ट) ला श्रावण सोमवार शेवटचा आहे की, पाचवा श्रावण सोमवार 2 सप्टेंबरला करायचा आहे का? कारण 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या आहे. अशात भक्तांमध्ये संभ्रम आहे. तुमच्या या प्रश्नाच निरासन ज्योतिषर्चाय आनंद पिंपळकर यांनी केलंय.
मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी 2 सप्टेंबरला पहाटे 5.21 पासून 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे. अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते. त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते. शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 संपणार असल्याने यादिवशी श्रावण सोमवारच व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे. पाच श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग 71 वर्षांनंतर जुळून आला आहे. 2 सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवमूठ सातू असणार आहे.
ब्रह्म मुहूर्त - 2 सप्टेंबर रोजी पहाटे 4:38 ते 5:24 पर्यंत
पूजा मुहूर्त - सकाळी 6.09 ते 7.44
पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील बैल पोळा हा शेवटचा सण मानला जातो. त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायचं आगमन होतं.
या अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात. घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते. अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो. याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात केला जातो. सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उटणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जातं. घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीच्या नैवेद्य बैलांना दिला जातो. ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करुन कृतज्ञता व्यक्त करतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)