Janmashtami And Shravan Somvar 2024 : जन्माष्टमीसह श्रावण सोमवारचा उपवास? मग सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या नियम

Janmashtami And Shravan Somvar 2024 Fast : जन्माष्टमीचा उपवास हा रात्री 12 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पण श्रावण सोमवारचा उपवास हा सोडावा लागतो? अशातच दोन्ही उपवास जर तुम्ही एकत्र करत असाल तर सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या.  

नेहा चौधरी | Updated: Aug 26, 2024, 04:20 PM IST
Janmashtami And Shravan Somvar 2024 : जन्माष्टमीसह श्रावण सोमवारचा उपवास? मग सोमवारचा उपवास कसा सोडावा? जाणून घ्या नियम title=
Janmashtami And Shravan Somvar fast together than How to break fast on Somvar Fasting rules

Janmashtami And Shravan Somvar 2024 Fast : देशभरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या थाट्या माट्यात साजरा होतोय. यंदा जन्माष्टमीला दुर्मिळ योग जुळून आला आहे. चौथा श्रावण सोमवारी जन्माष्टमीचा सण आला आहे. श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवारी भगवान महादेवाची पूजा करुन शिवमूठ अपर्ण करण्यात येत असते. चौथा श्रावण सोमवारी जव ही शिवमूठ आहे. तर श्रावण सोमवारचा उपवास हा संध्याकाळी सोडायचा असतो. तर जन्माष्टमीचा उपवास हा अहोरात्र किंवा रात्री 12 नंतर सोडायचा असतो. अशातच जर तुम्ही श्रावण सोमवार आणि जन्माष्टमीचा उपवास केला असाल. तर मग सोमवारचा उपवास कसा सोडायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

जन्माष्टमीसह श्रावण सोमवारचा उपवास? मग सोमवारचा उपवास कसा सोडावा? 

आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांनी यावर उपाय सांगितला आहे. जर तुम्ही दोन्ही उपवास धरले असतील, तर यावेळी श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन सोडावा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anand Pimpalkar (@pimpalkaranand)

त्याशिवाय दुसरा उपाय असा आहे की, एका तांब्याचा ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यात कापूर आणि तुळशी पान घाला आणि देवाला नमन करा. मी श्रावण सोमवारचा उपवास सोडतेय आणि जन्माष्टमीची उपवास सुरु ठेवतंय. आता हे पाणी ग्रहण करा. या दोन पद्धतीने तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास सोडू शकता, आणि जन्माष्टमीचा उपवास सुरु राहिली. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)