SHUKRA GOCHAR : आजपासून ‘या’ पाच राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी...

आज २३ मे रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश आहे. शुक्राच्या या संक्रमणामुळे या पाच राशींना मोठा फायदा होणार आहे.

Updated: May 23, 2022, 01:29 PM IST
SHUKRA GOCHAR : आजपासून ‘या’ पाच राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी... title=

मुंबई : आज २३ मे रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. सौभाग्याचे प्रतीक म्हणजे शुक्र ग्रह. प्रतेय्क ग्रह आपल्या मूळ राशीतून अन्य राशीत प्रवेश करतात. त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असतो.

ग्रहांच्या या राशी बदलामुळे काहींचे नशीब बदलते तर काहींचे नशीब खुलते. अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. शुक्र ग्रहाचे मेष राशीत होणारे संक्रमणाचे परिणाम कोणत्या राशीच्या होणार आहेत. त्याचे काय परिणाम दिसणार आहेत ते जाणून घेऊ.

धनु : या राशींच्या व्यक्तींनी या काळात व्यवहार केल्यास त्याचे उत्तम फायदे मिळतील. यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. ही वेळ गुंतवणुकीसाठी चांगली आहे. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. 

मेष : देवी लक्ष्मी या राशींच्या लोकांवर अधिक प्रसन्न राहील. गुंतवणुकीतून फायदा होऊन आर्थिक बाजू मजबूत राहील. व्यवहारासाठी हा महिना अतिशय शुभ राहील.

वृश्चिक : व्यवहारासाठी हा काळ अत्यतं शुभ आहे. तुमच्या कामात यश मिळेल. व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो. पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. 

कुंभ : लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद या राशीच्या लोकांना मिळेल. व्यापारी वर्गासाठी, नवीन गुंतवणुक, वाहन, घर खरेदीसाठी काळ चांगला आहे. आर्थिक लाभ होईल. 

मिथुन : व्यवहारासाठी अत्यंत शुभ काळ असला तरी नीट विचार करून व्यवहार करा. आर्थिक स्थिती चांगली होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे.