Raksha Bandha Mahayog : पंचांगानुसार श्रावणातील शुक्ल पक्षातील तिथीला पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा तर कुठे नारळी पौर्णिमा म्हणून संबोधलं जातं. याच श्रावण पौर्णिमेला भावा बहिणाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण भावंडांसाठी धनलाभाचा योग घेऊन आला आहे. 200 वर्षांनंतर शनि गुरु प्रतिगामी स्थितीत राहणार आहे. तर 700 वर्षानंतर बुधादित्य, शश, वासरपति, गजकेसरी आणि भ्रातवृद्धी हे पाच महायोग जुळून आले आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना अचानक धनलाभासोबत यश मिळणार आहे. (raksha bandhan 2023 after 200 years shani Guru Vakri and after 700 years 5 mahayog three zodiac signs get Rich)
या राशींच्या लोकांना पुढील एक महिन्या वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होणार आहे. त्यामुळे त्यांची पैशांची समस्या दूर होणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. पैशांची बचत करण्यास ते यशस्वी होणार आहेत.
या राशीच्या लोकांना शनिदेव चांगला फलदायी ठरणार आहे. या लोकांच्या संपत्ती वाढ होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ आहे. प्रगती आणि यशाचं शिखर तुम्ही गाठणार आहात.
या राशीच्या लोकांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहेत. तब्येतीत सुधारणार होणार आहे. समाजात आदर वाढणार आहे. विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीत यश मिळणार आहे.
या राशींसाठी पंचमहायोग अतिशय भाग्यशाली आहे. या लोकांना गाडी किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत. नवीन लोकांच्या भेटीगाठी तुम्हाला भविष्यात फलदायी ठरणार आहे. व्यवसाय करण्याचा विचारात असाल तर हा उत्तम काळ आहे. मात्र गुंतवणूक करताना काळजी घ्या.
या राशीच्या लोकांना पंचमहायोग अतिशय लाभदायी ठरणार आहे. आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे. त्यासोबत नातेवाईकांकडून धनलाभाचे योग आहेत. वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी पंचमहायोग अतिशय फलदायी ठरणार आहे. या लोकांच्या शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु असताना हा योग सकारात्मक ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबात आनंदायी वातावरण असेल. नोकरदारांना नवीन जबाबदारी मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)