होळीच्या दिवशी अंकशास्त्रानुसार 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांनी समृद्धीसाठी 'या' गोष्टी करा!

Holi NumerologyTips in Marathi : होळीच्या शुभ मुहूर्तावर 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Mar 23, 2024, 12:54 PM IST
होळीच्या दिवशी अंकशास्त्रानुसार 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांनी समृद्धीसाठी 'या' गोष्टी करा!  title=
numerology prediction do these upay on holi with people born on date 6 15 24 ank shashtra

Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीचा हा उत्साह सकारात्मक आणि शुभ मानला जातो. हिंदू धर्मातील हा शेवटचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींवर सकारात्मकतेचा विजय करण्यासाठी अतिशय भाग्यशाली मानला जातो. एस्ट्रो आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी अंकशास्त्रानुसार प्रत्येकासाठी होळीचा हा दिवस असा आयुष्यभरासाठी शुभ आणि भाग्यशाली बनवता येईल याबद्दल काही उपाय सांगितले आहेत. 

अंकशास्त्रानुसार 6, 15, 24  या तारखेला ज्यांचा वाढदिवस असतो त्या लोकांनाचा मूलांक हा 6 असतो. होळी हा रंगांचा सण असल्याने या मूलांकाने कुठल्या रंगांसोबत होळी खेळावी. त्यासोबत होळीच्या दिवशी कुठल्या रंगांचे कपडे घालावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. (numerology prediction do these upay on holi with people born on date 6 15 24 ank shashtra)

हेसुद्धा वाचा - Holi 2024 : होळीला फॅशन म्हणून नव्हे तर 'या' साठी घालतात पांढरे कपडे! कारण जाणून तुम्ही परिधान करणार

होळीचा सण हा 6 मूलांक असलेल्या लोकांनी कसा साजरा करवा?

अंकशास्त्रानुसार 6 हा क्रमांक शुक्र ग्रहाचा मानला जातो. शुक्र हा संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे 6 मूलांक असलेली लोक शुक्रासारखी चमकतात. या लोकांनी होळीच्या दिवशी पांढरे कपडे परिधान करावेत. तर पांढरा, सिलव्हर, फिकट गुलाबी आणि फिकट हिरव्या रंगाने होळी खेळावी.

हेसुद्धा वाचा - होळीला सुख समृद्धीसाठी अंकशास्त्रानुसार 5, 14, 23 या जन्मतारखेच्या लोकांनी घरात आणावे 'हे' रोप!

त्यासोबत या लोकांनी होळीच्या दिवशी सुंगधी अत्तर किंवा परफ्यूम लावा. खास करुन खस किंवा गुलाब सुंगधाचा उपयोग करावा. 

होळी खेळायला जाण्यापूर्वी माता लक्ष्मीची पूजा करायला विसरु नका. शुद्ध तूपाचा लावून माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करा. होळीच्या दिवशी खीर नक्की बनवा. ही खीर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र मिळवून खावी. त्याआधी घरातील ज्येष्ठ महिला किंवा आईला खायला द्यावी. या उपायामुळे तुम्ही शुक्र आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करतात. तुम्ही होळीच्या दिवशी हे उपाय केल्यास तुम्हाला आयुष्यभर यश, प्रगती आणि समृद्धी लाभेल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)