जोडव्या घालताना 'या' चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं...

जोडव्या घालणं हे विवाहित असल्याचं एक चिन्ह आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, यासाठी केलेल्या चुका पतीच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

Updated: Apr 25, 2022, 08:14 PM IST
जोडव्या घालताना 'या' चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं...  title=

मुंबई : हिंदू धर्मात विवाहित महिलांना काही वस्तू परिधान करणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये कपाळावर सिंदूर किंवा टिकली, गळ्यात मंगळसूत्र आणि बोटात अंगठी घालणे आहे. त्यात पायांच्या बोटामध्ये जोडव्या घालणे हे देखील महत्वाचं आहे. लग्नाच्यावेळी पायात जोडव्या घालण्याची विधी देखील पार पाडली जाते. जोडव्या घालणं हे विवाहित असल्याचं एक चिन्ह आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, यासाठी केलेल्या चुका पतीच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे जाणून घ्या की, जोडव्या घालताना कोणत्या चुका करु नये.

जोडव्या घालताना या चुका करू नका...

हिंदू धर्मग्रंथांपासून ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्रापर्यंत असे नमूद केले आहे की, पायांच्या बोटात कधीही सोने घालू नये. ज्यामुळे चांदी पायात घालणे कधीही चांगले.

असे सांगितले जाते की, पायात सोन्याचे दागिने कधीही घालू नयेत. मग ते जोडव्या असो, साखळ्या असो किंवा आणखी काही.

याशिवाय आपल्या जोडव्या इतर स्त्रियांना कधीही देऊ नका. अशा गोष्टीमुळे नवऱ्यावरील ताण वाढतो. तो पैसा गमावतो आणि कर्जाचा बोजा त्याच्यावर वाढत जातो.

पायांतील सखळ्यांमध्ये किंवा जोडवींमध्ये घुंगरूंचा आवाज जरी मधुर वाटत असला तरी वास्तूनुसार असे दागिने जीवनात अडचणी आणू शकतात. त्यामुळे आवाज नसलेले दागिने नेहमी घाला.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)