Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश

Budh Gochar In November 2023 : नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यात ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Oct 17, 2023, 11:35 AM IST
Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश title=
Mercury will transit in Scorpio These zodiac signs will get success in every field and Budh gochar in november 2023

Budh Gochar In November 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह हे 12 राशीत भ्रमण करत असतात. प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या संक्रमणामुळे 2 राशीवर त्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. या ग्रहांच्या भ्रमणामुळे कुंडलीत एखाद्या राशीत शुभ किंवा अशुभ योगही तयार होता. 30 ऑक्टोबरला मायावी केतू आणि राहू दीड वर्षांनी आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये बॅक टू बॅक शुक्र आणि शनि आपली स्थिती बदलणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ग्रहाचा राजकुमार बुधदेवही आपली स्थिती बदलणार आहे. नोव्हेंबरमध्ये बुध ग्रह तूळ राशीतून वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे काही लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. चला मग जाणून घेऊयात या तुमच्या राशीचा समावेश आहे का? (Mercury will transit in Scorpio These zodiac signs will get success in every field and Budh gochar in november 2023)

बुधदेव 'या' राशींना ठरणार लकी!

तूळ (Libra Zodiac)

राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लकी ठरणार आहे. तुमच्या राशीच्या धन गृहात बुध ग्रह भ्रमण करेल. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना अनपेक्षित धनलाभ होणार आहे. बुध गोचरमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.  तुमच्या राशीच्या नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ मिळणार आहे. यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहात. 

मकर (Capricorn Zodiac)

बुध राशीतील बदल मकर राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. हे संक्रमण तुमच्या कुंडलीच्या उत्पन्नाच्या घरात असल्याने तुमचं उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठ्या प्रमाणात प्रलंबित पैसे मिळणार असल्याने यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. त्याशिवाय तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी चालू येणार आहे. 

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण फायदेशीर आणि भाग्यशाली ठरणार आहे.  बुध ग्रह तुमच्या राशीतून भाग्यस्थानात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या काळत नशीबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. यासोबतच मीन राशीचे लोक धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामुळे घरातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Chandra Grahan 2023 : दसऱ्यानंतरचं शेवटचं चंद्रग्रहण 'या' राशींना करणार श्रीमंत, दिवाळी होणार आनंदी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)