Mangal Gochar 2023: 1 जुलैपर्यंत 'या' राशींवर राहणार मंगळ देवाची कृपा, खराब दिवस येणार संपुष्टात!

Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रहाने 10 मे रोजी कर्क राशीत प्रवेश केलाय. कर्क राशीत मंगळाच्या गोचरमुळे राजयोग तयार झालाय. मंगळाचं हे गोचर सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे. 

Updated: Jun 1, 2023, 09:46 PM IST
Mangal Gochar 2023: 1 जुलैपर्यंत 'या' राशींवर राहणार मंगळ देवाची कृपा, खराब दिवस येणार संपुष्टात! title=

Mangal Gochar 2023 : ज्यावेळी एखादा ग्रह गोचर करतो तेव्हा प्रत्येक राशीवर त्याचा काहीना काही प्रभाव पडताना दिसतो. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे काही राशींवर चांगला तर काही राशींवर वाईट परिणाम झालेला दिसून येतो. दरम्यान ज्योतिष्य शास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला विशेष स्थान देण्यात आलं आहे. 

मंगळ ग्रह हा धैर्य, पराक्रम, भूमी, शौर्य, संपत्ती, विवाह यांचा कारक मानला जातो. त्यामुळे मंगळाच्या बदलामुळे सर्व राशींवर परिणाम होतोना दिसतो. मंगळ ग्रहाने 10 मे रोजी कर्क राशीत प्रवेश केलाय. मंगळ 1 जुलैपर्यंत कर्क राशीत राहणार आहे. 

कर्क राशीत मंगळाच्या गोचरमुळे राजयोग तयार झालाय. मंगळाचं हे संक्रमण सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे. 12 राशींपैकी 3 राशी अशा आहेत ज्यांच्यावर याचा अधिक प्रभाव दिसून येणार आहे. जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत आणि त्यांच्यावर कसा परिणाम होणार आहे. 

मेष रास ( Aries )

कर्क राशीत मंगळाच्या गोचरमुळे मेष राशीचे लोकांच भाग्य उजळणार आहे. या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्ता खरेदीचा आनंद मिळणार आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत करू शकणार आहात.

कर्क रास ( Cancer ) 

मंगळ ग्रहाच्या कर्क राशीत प्रवेशाचा या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. मंगळाच्या भ्रमणामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात खूप बदल घडून येण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या तब्येतीतही सुधारणा होऊ शकते. तुम्हाला पैसे कमावण्याच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा होणार आहे. या काळामध्ये नशीबाची तुमच्यावर साथ असणार आहे. 

तूळ रास ( Libra )

मंगळाच्या गोचरचा या राशीच्या व्यक्तींना खूप फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला वजन मिळाणार आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जाण्याची चांगली संधी मिळेल. लोक तुमच्या कामाचंही कौतुक करणार आहेत. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला चांगले परिणाम दिसून येणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )