Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश

June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय. 

नेहा चौधरी | Updated: May 24, 2024, 09:20 AM IST
Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश title=
Horoscope June 2024 5 Rare Rajyog with Lakshmi Narayan in June Success these zodiac signs in work with increments

June 2024 Prediction: बघता बघता या वर्षातील 6 महिना म्हणजे जून महिन्याला सुरुवात होणार आहे. जून महिना मान्सूनचं आगमनासह वटपौर्णिमेपासून सणाला सुरुवात होते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारा जून महिना अतिशय खास असणार आहे. कारण जून महिन्यात लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग निर्माण होणार आहे. शुक्र देव आणि शनिदेवासह अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. जून महिन्यात शुक्रादित्य, मालव्य, लक्ष्मी नारायण, रुचिक राजयोग, मालव्य हे राजयोग तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशीच्या लोकांना पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मानसह आर्थिक लाभ होणार आहे, असं भाकीत ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी केलंय. 

मेष रास (Aries Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी जून महिना अतिशय खास असणार आहे. जूनच्या पहिल्याच दिवशी ग्रहांचा अधिपती मंगळदेव मेष राशीत गोचर करणार आहे. मंगळ गोचरमुळे रुचक राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी जून महिना अतिशय शुभ ठरणार आहे. तुमचे रखडलेले कामं मार्गी लागणार आहे. तुमच्या आत्मविश्वास, धैर्य आणि उत्साहात वाढ होणार आहे. नोकरदार लोकांना लाभ होणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळणार आहे. कुटुंबासोबत आनंदायी वेळ जाणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असून जोडीदारासोबत चांगला वेळ जाणार आहे. 

मिथुन रास (Gemini Zodiac)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात मिथुन राशीच्या कुंडलीत बुध आणि सूर्य पहिल्या घरात असेल. ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला असणार असून तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. तुमच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होणार आहात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा मिळणार आहे. आरोग्य चांगल राहणार असून लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात आनंद असेल. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिना खूप चांगला सिद्ध होणार आहे. या राशीत षषसह इतर राजयोगांचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्हाला दीर्घ आजारापासून आराम मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. यासोबत तुम्हाला बढती, पदोन्नती किंवा इतर काही जबाबदारी देण्यात येणार आहे. ही नवीन जबाबदारी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पडणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या दूर होणार आहे. शारीरिक समस्यांपासून आराम मिळणार आहे. वैवाहिक जीवनातही आनंद असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)