Narad Jayanti 2024 : दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीला नारद जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी नारद मुनींचा जन्म झालं अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार कठोर तपश्चर्या नंतर नारदजींना स्वर्गात देवर्षी ही पदवी मिळाली होती. नारद मुनीला तिन्ही लोकात भ्रमण करण्याचे वरदान लाभलं होतं. धर्मग्रंथांनुसार नारदजी हे ब्रह्मदेव यांचं सहा पुत्रांपैकी एक मानले जातात. तर ते विश्वाचे दूर मानले गेले आहेत. असं म्हणतात की, कठोर तपश्चर्यामुळे नारदजींना भगवंताच्या मनातील विचार कळत होते. म्हणून त्यांना भगवंतांचं मन संबोधलं जातं. कारण भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांचा जाणकार मानले जातात.
महाभारतानुसार देवर्षी नारद हे सर्व वेदांचे जाणकार, इतिहास आणि पुराणांचे जाणकार, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचं ज्ञान असलेले, बलवान वक्ते, ज्ञानी,कवी, संगीतकार, जो शंकांचे निरसन करतो, ज्याला तिन्ही जगाचे ज्ञान असून तो अत्यंत हुशार होता असं सांगण्यात आलंय. तो ज्ञानाचे रूप, ज्ञानाचे भांडार, सद्गुणाचा आधार, आनंदाचा सागर आणि प्रत्येक जीवाचे कल्याण करणारा नारद हा लोकप्रिय होता. तो देवाचा सर्वात प्रिय असून सर्व जगामध्ये त्याची अखंड हालचाल असायची.
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय, अत्याचार आणि धर्माची हानी व्हायची, तेव्हा ते भगवंताच्या अवतारासाठी पृथ्वीतलावर येयाचे आणि त्यांच्या लीलामधून साथीदाराची भूमिका बजावतात. पौराणिक कथेनुसार देवर्षी नारद हे विश्वाचे पहिले पत्रकार मानले गेले आहे. तिन्ही जगात कुठेही फिरता येईल, असे वरदानही त्याच्याकडे असल्याने त्यांना सर्व गोष्टींची माहिती असायची. देवर्षी नारद म्हणतात की मानवी जीवनाचा अर्थ सत्संग आणि दैवी योजनांनुसार कार्य करणे हा असायला पाहिजे.
पुराणानुसार, नारद मुनी हे ब्रह्मदेवांच्या सहा मानसपुत्रापैकी एक होते. भगवान ब्रह्मदेवाने नारद मुनींना सृष्टीच्या कार्यात मदत करण्यास आणि लग्न करण्यास सांगितले होतं. मात्र देवर्षी नारद मुनी यांनी वडील ब्रह्मदेवाची आज्ञा मानण्यास नकार दिला आणि ते भगवान विष्णूच्या भक्तीत मग्न राहिले. त्यामुळे ब्रह्मदेवाने नारद मुनीला शाप दिला की तो आयुष्यभर अविवाहित राहील.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)